अमोल लोहकरे मित्र परिवारच्या वतीने जामखेडची कन्या कु.आंचल चिंतामणी हिचा सत्कार

जामखेड प्रतिनिधी

चेन्नई येथे झालेल्या फ्लॉवर बॉल स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याबद्दल जामखेडची कन्या कु. आंचल अमित भाऊ चिंतामणी हिचा अमोलभाऊ लोहकरे मित्र परिवारच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या बरोबरच तिला मार्गदर्शन करणारे व तिच्या पालक अमित भाऊ चिंतामणी व त्यांची पत्नी यांचे देखील अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रतिष्ठित व्यापारी महेश शेठ नगरे यांना वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळेस उपस्थितीत कु. संध्याताई सोनवणे ,कु. श्रेया तंटक,कु. जानवी कस्तुरे, सौ. स्वप्नाली बिडकर, महेश नगरे, महेश कस्तुरे, अनिल लोहकरे, शरद जगताप, ऋतुराज फुटाणे, सागर लोहकरे, गिरीश काथवटे, अमित भंडारी, संतोष निमोणकर, राजू गवळी, अंकुश भाऊ बरबडे, बजरंग सरडे, अमरनाथ डोंगरे, पराग शिंदे, सुनील कलासागर, ऋषिकेश मोरे, अमोल कचरे, प्रतीक शिंगवी, महेश सोनवणे, मोरेश्वर रेळेकर, आनंद गांधी, दत्ता चव्हाण, अमोल चिंतामणी, इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here