अहमदनगर प्रतिनिधी

बेकायदेशीर रित्या तलवारी बाळगणाऱ्या जामखेड तालुक्यातील रत्नापुर येथील व्यक्तीला अहमदनगर च्या स्थानिक गुन्हे शाखेने नगरमध्ये पाळत ठेऊन पकडले आहे. त्याच्या कडून ४ तलवारी सह वाहन जप्त करण्यात आले. पकडलेली व्यक्ती जामखेड तालुक्यातील रत्नापुर येथील आसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे हे.कॉ. संदीप घोडके यांना गुप्त बातमी दाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली कि, इसम नामे अशोक राळेभात, रा. रत्नापूर, ता- जामखेड हा त्याचे ताब्यातील चार चाकी वाहन नं. एम. एच-०४ – जेबी- ३७५० मधून चार तलवारी घेवून दिल्ली गेट कडून सिव्हील हॉस्पिटल कडे जाणार आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली. या नंतर या बाबत ची माहीती वरिष्टांना कळवून त्यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पो.हे.कॉ संदीप घोडके,
विश्वास बेरड, भाऊसाहेब कुरुंद, पो. ना. दिनेश मोरे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पो.को. सागर ससाणे, रोहीत येमूल, रणजित जाधव, मयूर गायकवाड, जालिंदर माने, विजय धनेधर, सागर सुलाने अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने निलक्रांती चौक या ठिकाणी सापळा रचून छाप्याचे नियोजन केले. दुपारी १६/१५ वा. च्या सुमारास मिळालेल्या बातमी मधील फिक्कट राखाडी रंगाची इर्टींगा कार नं. एम. एच-०४- जेबी- ३७५० ही दिल्ली गेट कडून निलक्रांती चौकाकडे येताना दिसली. त्याच वेळी पथकातील कर्मचारी यांना रस्त्यावर घेवून सदर गाडीमधील चालकास इशारा देवून त्याची गाडी थांबवली. या नंतर गाडीस घेराव घातला व गाडी चालकास त्याची गाडी रस्त्याचे बाजूस घेण्यास सांगीतले. त्यानंतर पथकातील कर्मचार्‍यांनी सदर गाडीमधील चालकास ताब्यात घेवून त्यांस पोलीस पथकाची व पंचाची ओळख सांगून त्याचे कारचे झडतीचा उद्देश कळवून त्यास त्याचे नांव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव, पत्ता अशोक बाळासाहेब राळेभात, वय- २६ वर्षे, रा. रत्नापूर, ता- जामखेड असे असल्याचे सांगीतले.

त्यानंतर त्याच्या कारची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे कारमध्ये ड्रायव्हर सिटचे पाटीमार्गील बाजूस एका
पांढरे रंगाचे गोणीमध्ये ३,८००/-रु. किं. च्या चार धारदार व टोकदार तलवारी मिळून आल्या. सदर तलवारी बाबत
त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने काही एक समाधानकारक माहिती सांगीतली नाही. सदरच्या तलवारी तसेच
६,५०,०००/-रु. किं. चे चार चाकी वाहन नं. एम. एच-०४-जेबी- ३७५० असा एकूण ६,५३,८००/- रु. किं. चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द तोफखाना पो.स्टे. येथे फिर्यादी पोकॉ/९०२ सागर अशोक ससाणे, नेम- स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही तोफखाना पो.स्टे. हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक, सौरभ कूमार आगरवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, विशाल ढमे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here