रोखठोक जामखेड…..

जामखेड तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. गेल्या ७ डिसेंबर पासुन ते २४ डिसेंबर या १८ दिवसांच्या कालावधीत शहरासह तालुक्यात ५ जणांनी आपल्या मृत्यूस कवटाळले आहे. आज पुन्हा खर्डा या ठिकाणी एका ४३ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली असुन ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.

जामखेड तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र काही थांबताना दिसुन येत नाही. या बाबत अधिक माहिती अशी की दि ७ डिसेंबर रोजी शहरातील आरोळे वस्ती या ठिकाणी नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा शहरात दुसर्‍या दिवशी म्हणजे ८ डिसेंबर रोजी मोरे वस्ती या ठिकाणी तरुणाने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या नंतर दि २० डिसेंबर रोजी संताजी नगर या ठिकाणी इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांनीने आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दि २२ डिसेंबर रोजी साकत जवळील कडभनवाडी या ठिकाणी आपली शेती विकुनही कर्ज फिटले नाही त्यामुळे त्याने देखील कर्जबाजारी पणाला कंटाळून एका शेतकर्‍याने आत्महत्या केली.

या सर्व घटना ताज्या आसतानाच आज दि २४ रोजी पुन्हा जामखेड तालुक्यातील खर्डा या ठिकाणी मयत विष्णू बन्सी आहेर वय ४३ वर्षे रा. खर्डा. ता. जामखेड याने त्रिंत्रज रोडवरील शेतातील बांधावरील लिंबाच्या झाडाला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गेल्या आठरा दिवसात पाच जणांनी आत्महत्या केली आसल्याने ही चिंतेचे बाब म्हणावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here