विजया दशमी निमित्ताने नगरसेवक बिबीशन धनवडे यांच्या कडुन प्रभाग १५ मधिल महीलांना साडीवाटप.

जामखेड प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक १५ मध्ये बिबीशन धनवडे यांचे सामाजिक कार्या बरोबरच धार्मिक कार्यात देखील सक्रिय आहेत. नवरात्रात उत्साहा निमित्ताने त्यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा महीला मंडळ गेल्या अठरा वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा करते. याच अनुशंगाने विजया दशमीच्या निमित्ताने नगरसेवक बिबीशन धनवडे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये सप्तशती पठण करणार्‍या महीलांसाठी साडीवाटप कार्यक्रम घेण्यात आला होता.

गेल्या अठरा वर्षांपासून प्रभाग क्रमांक १५ मध्ये नगरसेवक बिबीशन धनवडे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. या कार्यक्रमात महीलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. नऊ दिवस नवरात्र उत्सवात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. घटस्थापने पासुन ते अष्टमी पर्यंत दुर्गा सप्तशती चे पाठ महीला मोठ्या प्रमाणात वाचन करतात या सर्व महीलांना नगरसेवक बिबीशन धनवडे यांच्या कडुन साडी वाटप करण्यात येते. सदरचा साडीवाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

नगरसेवक बिबीशन धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा महीला मंडळ आयोजित नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री जगदंबा देवी मंदिर उभारणीचे काम देखील सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच कार्यक्रमाचा शुभारंभ आ. प्रा राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील नगरसेवक बिबीशन धनवडे यांनी आपल्या प्रभागातील भाविकांना स्वखर्चाने मोहटा देवी दर्शन घडवीले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here