दहा वर्षाच्या मुलाला चावला साप, मुलासह सापाला घेऊन रुग्णाचे नातेवाईक आले दवाखान्यात पुढे काय घडले सविस्तर वाचा

जामखेड प्रतिनिधी

घराच्या पडवीत दुपारी जेवण करत आसताना दहा वर्षाच्या मुलाला सापाने चावा घेतला. यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी सर्पदंश झालेल्या मुलासह सापाला घेऊन तातडीने जामखेड येथिल समर्थ हॉस्पिटल या ठीकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी यावर डॉक्टरांनी त्याच्यावर योग्य उपचार करून या मुलाचे प्राण वाचवले. मुलाचे प्राण वाचविल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांन कडुन डॉक्टरांचा सन्मान केला.

साप दिसताच भल्या-भल्यांना पळता भुई कमी पडते अशी ग्रामीण भागात एक वाक्यप्रचार बोलला जातो. त्याचे कारण म्हणजे साप जर दिसला तर म्हणून जिवाच्या आकांताने त्यापासून दूर पळत असतो. आष्टी तालुक्यातील कापसी येथील सोपान गोल्हार यांचा मुलगा आदित्य या दहा वर्षाचा मुलगा हा दि ३० सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातील पडवी मध्ये जेवण करत होता. यानंतर त्या ठिकाणी अचानक एक विषारी साप आला व आदित्य याच्या पायाच्या बोटांना चावा घेतला.

यानंतर सदरची घटना आदित्यने आपले वडील सोपान गोल्हार यांना सांगितले. या नंतर आदित्य च्या वडीलांनी व घरातील लोकांनी या सापाला मारुन पीशवी मध्ये टाकुन सापासह आष्टी येथील दवाखान्यात घेऊन गेले मात्र त्या ठिकाणी सर्प चावलेल्या पेशंटवर उपचार करण्याची सोय नसल्याने डॉक्टरांनी त्यांना नगर येथील दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले मात्र नातेवाईकांनी प्रसंगावधान राखून तातडीने जामखेड शहर हे जवळ असल्याने त्या ठीकाणी आसल्याने बीड रोडवरील समर्थ हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. यावेळी त्यांनी मयत झालेला साप देखील सोबत आणला होता याचे कारण म्हणजे साप कोणत्या जातीचा आहे हे पाहुन डॉक्टरांना योग्य उपचार करता येतील.

यानंतर तातडीने या ठीकाणी आसलेले एम डी डॉ अजित जगधने व डॉ भरत दारकुंडे यांनी मुलाला तातडीने व्हेंटीलेटर वर ठेवले व योग्य उपचार केले. डॉक्टरांनी आदित्य याच्यावर योग्य उपचार केल्याने त्याच्या प्रकृतीमध्ये हाळु हाळु सुधारणा झाली आहे. आता आदित्य याची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. त्याला आजच डीर्चार्ज देखील मिळणार आहे आशी माहिती डॉक्टरांनी दिली.

समर्थ हॉस्पिटल मध्ये योग्य उपचार करुन आदित्य याचे प्राण वाचवल्याबद्दल वडील व नातेवाईकांनी हॉस्पिटल मधिल डॉ भरत दारकुंडे व डॉ अजित जगधने यांचा सन्मान केला. यादरम्यान हॉस्पिटल मधिल सचिन गाडे, अतुल वाळुंजकर, रवी बारस्कर, निलोफर शेख, आयुषा खेडकर, स्वाती तागड या कर्मचाऱ्यांचे देखील सहकार्य लाभले.

यावेळी बोलताना डॉ भरत दारकुंडे यांनी सांगितले की आमच्या हॉस्पिटल मध्ये सर्पदंश, विषबाधा, हार्ट अ‍ॅटॅक, हाडांचे ऑपरेशन, कीडनी स्टोन व भाजलेल्या रुग्णांवर उपचार होतात त्यामुळे रुग्णांना आता नगर कींवा पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही. आदित्यच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचा सन्मान केल्या बद्दल डॉक्टरांनी देखील रुग्णांच्या नातेवाईकांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here