नाशिकमध्ये मोठी दुर्घटना! खासगी बसला लागलेल्या आगीत १० प्रवाशांचा होरपळून मृत्यू.

नाशिक: नाशिकमध्ये नांदूर नाक्‍याजवळ खासगी बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बसला भीषण आग लागली. या अग्नितांडवात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेत १० प्रवाशांचा मृत्‍यू झाल्‍याची भीती वर्तवली जात आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला आहे.

यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. या बसला आग लागली. ही बस स्लीपर कोच होती. दरम्यान या आगीत दहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागून हा भीषण अपघात झाला आहे. धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेलरची बसला धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. ट्रेलरची बसला धडक बसली, यामुळे बसने पेट घेतला. यामध्ये दहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाकडून अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. स्लीपर बसमध्ये सुमारे ४० च्या आसपास प्रवाशी प्रवास करत होते, अशी माहिती समजली आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवाशी बस जळून खाक झाली. ही आग एवढी भीषण होती या आगीमध्ये दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. पहाटे 04 वाजून 20 मिनिटांनी हा अपघात झाला.

यवतमाळ येथून ही बस काल रात्री नाशिकच्या दिशेने रवाना झाली. त्यातून ४० पेक्षा अधिक प्रवाशी होते. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात ट्रक आणि बस यांच्यात भीषण अपघात झाला. यात ट्रकची डिझेल टाकून फुटून सर्वत्र डिझेल पसरले आणि दुसरीकडे बस अन्य एका चारचाकीला धडकली. त्यानंतर लगेचच बसमध्ये स्फोट होऊन आग लागली. अनेक प्रवाशी झोपेत असल्याने काही समजण्याच्या आतच त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here