“आईच्या” स्मरणार्थ सुपूत्रांकडून “स्वर्गरथ”; प्रसिध्दीपासून अलिप्त असलेल्या पोखरणा बंधूंचा त्सुत्य उपक्रम
——————–
राजेंद्र जैन / कडा
—————–
एका बाजूला सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये सतत पुढाकार घेत असतानाच, दुसरीकडे मात्र प्रसिध्दीपासून अलिप्त राहतात. मात्र कुठलाच व्यावहारिक दृष्टीकोण न बाळगता केवळ सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून गरजुंना मदतीचा हात देणा-या येथील पोखरणा बंधूंनी चोहीकडून विस्तारलेल्या शहराची गरज ओळखून कडेकरांना “स्वर्ग” रथाची आगळीवेगळी भेट दिली आहे.

आष्टी तालुक्यातील कडा येथील पोखरणा परिवाराचे सामाजिक आणि धार्मिक कार्यात असलेले महत्वपुर्ण योगदान कुणालाही नाकारता येणारे नाही. एका हाताने केलेले दान दुस-या हाताला कळता कामा नये, असा बाणा ठेवून प्रसिध्दी आणि दिखावपणापासून अलिप्त राहिलेल्या राजाभाऊ पोखरणा व हेमंत पोखरणा या कर्णवृत्तीच्या बंधूंनी चोहीकडून विस्तारलेल्या कडा शहराची अत्यंत महत्वाची गरज ओळखली आहे. कारण स्मशानभूमी पर्यंतचे अंतर दिवसेंदिवस अधिक होऊ लागले असून ब-याचदा एखाद्या व्यक्तिचे निधन झाल्यावर त्या मयताला खांद्यावर घेऊन जाणे तसे अवघड होते, त्यामुळे शहराला स्वर्ग रथाची गरज होती. विशेष म्हणजे पोखरणा परिवाराने कुठलाही व्यावहारिक दृष्टीकोण न ठेवता सामाजिक भावनेतून मातोश्री स्वर्गीय कमलबाई बाबुलाल पोखरणा यांच्या पुण्यस्मरणार्थ कडेकरांना या “स्वर्ग रथाची” भेट दिली. पोखरणा बंधूंनी आगळ्यावेगळ्या पध्दतीने सामाजिक ऋणाची परतफेड केली म्हणावी लागेल. त्यामुळे त्यांच्या सामाजिक उपक्रमाचे कडेकरांनी उस्फुर्तपणे स्वागत केले आहे.


—–%%—-

चौकट 

सामाजिक दायित्वाची जाण ठेवणारी माणसं…
———————
सामाजिक एकतेचा धागा पकडून एकमेकांच्या सुख- दु:खात मदतीचा हात दण्याची कड्याची परंपरा आहे. हीच एकतेची भावना, परंपरा डोळ्यासमोर ठेवून हेमंत पोखरणा, दत्तात्रेय दळवी, राजमल भंडारी, पुरुषोत्तम जोशी, अल्ताफ तांबोळी या परोपकारी माणसांनी वेगवेगळ्या मदतीच्या माध्यमातून जपली आहे. याचाच कडेकरांना अभिमान आहे.
– रमजानभाई तांबोळी
सामाजिक कार्यकर्ते कडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here