भावी नगरसेवक मोहन (मामा) गडदे यांच्या कडुन भाविकांना घडवीले मोहटा देवी दर्शन

जामखेड प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक २१ मधिल चुंबळी येथील भाजप कडुन इच्छुक आसलेले आ. प्रा राम शिंदे यांचे खंदे समर्थक मोहन (मामा) गडदे यांनी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांना मोहटादेवी दर्शन घडवुन आणले. या वर्षीचे त्यांचे हे दुसरे वर्ष आहे.

आ. प्रा राम शिंदे यांचे खंदे समर्थक आसलेले चुंबळी येथील मोहन (मामा) गडदे हे आपल्या प्रभाग क्रमांक २१ मध्ये सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच सक्रिय आसतात. पंढरपूर या ठीकाणी देखील आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घडवुन आणत असतात. तसेच दर वर्षी मुलाच्या वाढदिवसानिमित्त देखील सामाजिक उपक्रम राबवून गावात अन्नदानाचे देखील मोहन गडदे हे काम करत असतात. त्यांनी आपल्या प्रभागातील शेकडो नागरीकांसाठी सालाबादप्रमाणे प्रमाणे भाविकांना मोहटादेवी दर्शन घडवुन आणले. भाविकांना मोहटा देवी दर्शन घडवुन आणण्यासाठी मोहन गडदे यांनी मोफत चार चाकी वाहनांची सोय केली होती. नऊ दिवस उपवास आसल्याने दुपारी मोहटा देवीच्या गडावर सर्वांसाठी महाप्रसादाची सोय केली होती. दर्शन घडवुन आणल्याने प्रभागातील भाविकांनी त्यांचे आभार व्यक्त केले. या वेळी चुंबळी सह प्रभाग २१ मधिल सर्व ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here