जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील मार्केट यार्ड मधुन ५ लाख ७५ हजार रुपय कीमतीचा सॉयबीन ने भरलेल्या मालाचा ट्रक संबंधित ड्रायव्हरने इतर ठिकाणी नेहुन परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी त्याच्या विरोधात अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत आडत व्यापारी यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फीर्याद दाखल केली आहे.

या बाबत समजलेली माहिती अशी की कृषी उत्पन्न बाजार समिती मधिल फीर्यादी कृष्णा ट्रेडर्स चे मालक राजेंद्र भाऊसाहेब डोके रा. मातकुळी ता. आष्टी यांनी ट्रक चालक शफीक मोहमंदरसुल सय्यद रा पिंपळगाव ता. भुम जिल्हा उस्मानाबाद यास ट्रक क्रमांक एम एच १२, ई. क्यु. ०१०४ या वहानात त्यांच्या आडत दुकानातील २४७ सॉयबीन च्या गोण्या असा ५ लाख ७५ हजार १६२ रुपये कीमतीचा माल दि ११ डीसेंबर रोजी ट्रक मध्ये भरुन दिला होता. सदरचा माल सांगली जिल्ह्य़ातील जयसिंगपूर येथील घोडावत फुड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या ठिकाणी पोहच करण्यास सांगितले. मात्र सदरचा माल त्या ठिकाणी पोहच झाला नाही. ट्रक ड्रायव्हर शफीक मोहमंदरसुल सय्यद याने या मालाची परस्पर दुसरीकडे कोठेतरी अपहार करून विल्हेवाट लावली आहे अशी फीर्याद जामखेड येथील आडत व्यापारी राजेंद्र डोके यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यानुसार ट्रक चालकाविरुद्ध दि १५ डिसेंबर रोजी अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ बापूसाहेब गव्हाणे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here