जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालुन गुन्हेगारी मोडीत काढायची आहे. तसेच मुली व महीलांच्या आडचणी सोडवण्यासाठी अॉपरेशन मुस्कान सह टु प्लस योजना राबविण्यात येणार आहे. नागरीकांनी पोलीस स्टेशनला न घाबरता आपली तक्रार कोणी घेतली नाही तर डायरेक्ट माझ्याशी संपर्क करा असे अवहान नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.
जामखेड पोलिस स्टेशन चा नव्याने चार्ज घेतलेले पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी नुकतीच पत्रकारान समवेत बैठक घेतली. यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधु उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. पुढे बोलताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले की तालुक्यातील पत्रकारांसह चांगल्या क्षेत्रातील लोकांना सोबत घेऊन कामे करायची आहेत. ग्रामसुरक्षा दल अॉक्टीव करणे, रात्रीची गस्त वाढवने, खाजगी सावकारकी चा बिमोड करायचा आहे. तसेच तालुक्यातील अवैद्य धंद्ये, गावठी कट्टे, कोणाकडे आसतील तर तशी माहिती मला कळवावी आपले नाव गुप्त ठेवले जाईल व संबंधित ठीकाणी कारवाई करण्यात येईल.
पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अॉपरेशन मुस्कान च्या माध्यमातून मुली व महीलांवरील अत्याचारांना आळा घातला जाणार आहे. तसेच ज्या व्यक्तीवर दोन कींवा दोन पेक्षा जास्त गुन्हे आसणार्या व्यक्तींची माहिती गोळा करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी देखील नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. तसेच रात्रीची गस्त वाढवण्याची एन सी सी चे विद्यार्थी व सेवानिवृत्त सैनिक व स्थानिक नागरिकांची मदत घेण्यात येणार आहे.