जामखेड प्रतिनिधी
शहरातील खर्डा रोड कॉर्नर येथे विदेशी दारू विक्री करत आसलेल्या ठिकाणी पोलीसांनी छापा टाकून आरोपी कडुन साडेनऊ हजार रुपयांची दारु जप्त केली आहे. सदरची कारवाई नवीनच आलेल्या पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केली.
शहरातील खर्डा रोड कॉर्नर येथे एक इसम चारचाकी वाहनाच्या आडोशाला विदेशी दारू विक्री करत आसल्याची गुप्त माहिती नविनच रुजू झालेले पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांना गुप्त खबऱ्या मार्फत मिळाली. त्या नुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी त्यांच्या पथकातील जामखेड पोलीस स्टेशन चे पो हे कॉ बापूसाहेब गव्हाणे, संग्राम जाधव, आबासाहेब अवारे, संदिप राऊत, संदिप आजबे, अरुण पवार, अविनाश ढेरे, शिवलिंग लोंढे, यांना सदर ठीकाणी जाऊन पहाणी करून छापा टाकुन कारवाई करण्यास सांगितले. त्या अनुषंगाने वरील पथक जामखेड खर्डा रोडवरील खर्डा कॉर्नर या ठिकाणी गेले व प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी आरोपी राजेंद्र श्रीधर पवार वय ३९ रा. शिवाजीनगर, नान्नज, ता. जामखेड हा प्लास्टिक च्या गोणी मध्ये विदेशी दारू विक्री करत असताना आढळून आला. या नंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कडील ९५२० रुपय कीमतीच्या विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. त्याच्या विरोधात पो. कॉ. संग्राम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ बापूसाहेब गव्हाणे हे करीत आहेत.
जामखेड पोलीस स्टेशनला नवीनच आलेले पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पहील्याच इन्ट्री मध्ये कारवाई केली आसल्याने अशीच कारवाई सुरूच ठेवली पाहिजे. त्या शिवाय अवैद्य धंद्याना वचक बसणार नाही. अनेक हॉटेल्स व ढाब्यावर अवैध दारू विक्री केली जात आहे मात्र या हॉटल व ढाब्यावर कारवाई होताना दिसुन येत नाही. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पहील्यांदाच पोलीस निरीक्षक यांनी आल्या बरोबरच कारवाई केली आसल्याने नागरीकांन मधुन समाधान व्यक्त केले जात आहे.




