जामखेड प्रतिनिधी

केंद्र सरकारने शेतीमालाविषयी केलेले तीन जाचक कायदे रद्द करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्ली येथे सूरू असलेल्या शेतकरयांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून ८ डिसेंबर रोजी भारत बंद पुकारण्यात आला होता. त्यात अनुशंगाने जामखेड येथे देखील भाजप वगळता इतर पक्ष व विविध संघटनांनी पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी, काँग्रेस पक्ष, प्रहार संघटना, भाजपा वगळता विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना या बंद मध्ये सहभागी झाल्या होत्या . सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या निषेधार्थ व शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तहसीलदार विशाल नाइकवाडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र कोठारी, प्रा मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, शिवसेनेचे संजय काशिद, काँग्रेसचे राहुल उगले, शहाजीराजे भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुनिल लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, प्रहार संघटनेचे जयसिंग उगले, आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा, बजरंग सरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिध्दीप्रमुख काकासाहेब कोल्हे, वैजीनाथ पोले, सुरेश भोसले, जमिर सय्यद, नगरसेवक अमित जाधव, अमोल गिरमे, वसीम मंडपवाले, रोफ सय्यद, फिरोज बागवान, प्रशांत राळेभात, प्रविण उगले, आकाश उगले, सरपंच कांतीलाल वाळुंजकर, प्रकाश काळे, माजी सरपंच सुनिल कोठारी, उमर कुरेशी, गणेश हगवणे, राहुल अहिरे सर, सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रा मधुकर राळेभात, दत्ताञय वारे, राजेंद्र कोठारी, जयसिंग उगले, संजय काशीद, सुरेश भोसले, आदींनी सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्याबात माहिती देत निषेधार्थ भाषण केले. यावेळी जामखेडमधील सर्व बाजपेठ बंद स्वयंपुर्तीने बंद ठेवण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here