अहमदनगर प्रतिनिधी
नगर – दौंड महामार्गावरील पवारवाडी शिवारात दुचाकी व ट्रक अपघातात प्रतिक नरसिंग शिंदे, राजकुमार विठ्ठल पवार, विशाल संतोष सोनवणे व राहुल बाजीराव बरकडे रा.पवारवाडी हे चौघे मित्र ठार झाले. यातील प्रतीक शिंदे व राहुल बरकडे हे दोघे इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत होते. तर इतर दोघे दहावीच्या वर्गात होते. पवारवाडी येथे हे चौघेही शेजारी – शेजारीच रहायला असल्याने त्यांची जिवाभावाची मैत्री होती. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यांमध्ये शोककळा पसरली आहे
याबाबत घडलेली घटना अशी की, आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते चौघे मित्र इनफिल्ड बुलेट क्रमांक एम एच सोळा बी एन ७७७१ या दुचाकी वर. पवारवाडी येथून लोणी व्यंकनाथ गावात जात असताना ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना समोरून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने क्रमांक एम एच ११ एम ५६६२ यावरील ड्रायव्हर तात्यासाहेब संपत पवार राहणार बेलवंडी खुर्द, तालुका पाटण, जिल्हा. सातारा याने अतिशय जोरदार वेगाने ट्रक चालून या दुचाकीस जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोरात होती की या धडकेनंतर परिसरामध्ये जोराचा आवाज झाला अन चौघेही मित्र ट्रकच्या पाठीमागच्या चाकाखाली सापडले गेले. दोघांच्या डोक्यावरून तर इतर दोघांच्या पोटावरुन चाक गेल्याने जाग्यावरच तिघांना मृत्यूने कवटाळले. तर एकाचा उपचारासाठी नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला. चार जिवलग मित्रांच्या मृत्यूच्या बातमीने लोणी व्यंकनाथ गावासह तालुक्यावर शोककळा पसरली होती.
व्यवहार बंद
सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. ही बातमी समजताच लोणी व्यंकनाथ येथील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत त्या चौघांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थांनी ट्रक ड्रायव्हर तात्यासाहेब संपत पवार यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये ट्रक ड्रायव्हर तात्यासाहेब पवार यांच्या विरोधात भादवि कलम व मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित माळी करत आहेत.