जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान वाॅल कंपाऊंड आणि विकास कामांसाठी आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून तब्बल ८० लाख रुपयांचा भरीव निधी दिला आहे . त्या कामाचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या हस्ते कब्रस्तान येथे नारळ फोडून करण्यात आला.

या कार्यक्रमात सहभागी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मधुकर आबा राळेभात, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, अजहर भाई काझी, शेरखान भाई, कलिमुल्ला चाचा कुरेशी, मुख्तार भाई सय्यद, जावेद भाई सय्यद, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे युवा नेते बिलाल शेख, जमीर भाई सय्यद, अमोल गिरमे, उमर भाई कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते जावेद भाई बागवान, सामाजिक कार्यकर्ते नासीर (चाचू) सय्यद, वसिम बिल्डर, वसिम सय्यद, चांद तांबोळी, युसूफ शाहा, उबेद भाई शेख, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ८० लाख रुपयांचा भरीव निधी समाज हितासाठी दिल्याबद्दल मुस्लिम समाजातील विविध मान्यवरांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित दादा पवार साहेब यांचे जाहीर आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here