जामखेड प्रतिनिधी

स्री दोन पैसे कमावती झाल्याशिवाय ख-या अर्थाने महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळणार नाही असे प्रतिपादन जामखेडच्या सभापती सौ.मोरे यांनी केले.
जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जामखेड पं.समिती च्या सभापती सौ. राजश्रीताई सुर्यकांत मोरे बोलत होत्या.
वर्षातून एक दिवस महिला दिन साजरा केल्याने महिलांचा सन्मान होतो असे नाही तर कायमच आपण आपल्या घरातील, समाजातील माता,भगिनी,पत्नी, मुलगी अशा विविध रुपातील महिलांचा सन्मान आपल्या वागण्या बोलन्यातुन केला पाहिजे.महिला कमावती झाली पाहिजे ,स्वतः च्या पायावर उभी राहिली पाहिजे त्यासाठी मुलींनी भरपूर शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तरच भविष्यात महिलांना समाजात व कुटुंबात ख-या अर्थाने पन्नास टक्के आरक्षण मिळेल.
असे आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ मोरे यांनी मुलींना मार्गदर्शन करताना सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.राजेंद्रजी कोठारी,राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मा.प्रा.मधुकर(आबा)राळेभात सर,शहराध्यक्ष मा.श्री. राजेंद्रजी गोरे,उपशहराध्यक्ष मा.प्रा.राहुल आहेर सर,राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे जामखेड तालुकाध्यक्ष मा.श्री. दिपक तुपेरे सर,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष मा.अवधुतजी पवार व तालुकाध्यक्ष प्रा.कुंडल राळेभात, नगरसेवक मा.दिगांबर चव्हाण, नागेश विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री. मडके सर ,कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.चौधरी मँडम, श्री सोनवणे सर,श्री. साळवे सर, मयुर भोसले सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात “शिवजयंती”निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाने घेतलेल्या रांगोळी स्पर्धेत मा.राजेंद्रजी कोठारी यांनी दिलेले रु.5000/-चे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रतिभा गणेश थोरे यांनी मिळवले, तसेच मा.प्रा.मधुकर (आबा)राळेभात यांनी दिलेले द्वितीय क्रमांकाचे रु.3000/-चे पारितोषिक निलम बाळासाहेब दळवी यांनी मिळवले व मा.राजेंद्रजी गोरे यांनी दिलेले तृतीय क्रमांकाचे रु.2000/-चे पारितोषिक नवनाथ शिवाजी बहिर यांनी मिळवले .
सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
जामखेड कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यिनी कु.श्रावणी सतिष माने व कु.प्रतिभा गणेश थोरे यांनाही नगरसेवक श्री दिगांबर चव्हाण व प्रा.कुंडल राळेभात यांनी पारितोषिके दिली.
पोलीस भरती झालेल्या मुलींचा तसेच सर्व महिला शिक्षिकांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जामखेड तालुका सांस्कृतिक विभाग अध्यक्ष श्री दिपक तुपेरे सरांनी केले.
सुत्रसंचलन श्री. सरसमकर सर यांनी तर आभार श्रीम.गायकवाड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here