जामखेड प्रतिनिधी
बदलत्या जीवनशैलीत समाजाचे आरोग्य धोक्यात आले असून स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. आपल्या समाजातील स्त्रीयांच्या आरोग्याविषयी जागरूकता आणने हाच स्त्रीशक्तीचा खरा सन्मान ठरणार आहे. असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले. कुपोषण, अँनिमिया, थायरॉईड, गर्भधारणा, प्रसुती, रजोनिवृत्ती अशा विविध आरोग्य विषयक प्रश्नावर मार्गदर्शन केले.
जामखेड महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्यात्या म्हणून डॉ. भारती मोरे बोलत होत्या. यावेळी दी पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डॉ. सुनिल नरके यांनी भूषविले. प्रास्ताविक प्रा.डॉ. रत्नमाला देशपांडे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. तुकाराम घोगरदरे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा. अविनाश फलके व प्रा.डॉ. नामदेव म्हस्के यांनी केले होते.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी वाणिज्य शाखेची कु. आरती मते हीने स्वागत गीत सादर केले. तर कु. कांचन बारवकर हिने स्वरचित कवितेच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, विद्यार्थी – विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.