पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार दत्तात्रय वडे यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार
जामखेड प्रतिनिधी
गेल्या ७५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच या संस्थेची निवडणूक कोर्टाच्या आदेशानुसार गुरुवारी दिं (५)जून पार पडली. यामध्ये १७ सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यामध्ये उध्दव देशमुख व अरुण चिंतामणी यांच्या नेतृत्वाखाली पॅनलची निर्विवाद विजय झाला. दत्तात्रय वडे या आधी ही संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिले होते. वयाच्या ९१ व्या वर्षी ते पुन्हा संचालक पदी नियुक्ती झाल्याने पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना संचालक वडे म्हणाले की, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी चे शिक्षण क्षेत्रात मोठे नाव आहे. या संस्थेत शिकलेले विद्यार्थी पुढे डॉक्टर, इंजिनिअर, सीए अशा मोठ्या पदावर गेले. येथून पुढील काळातही विद्यालयात व महाविद्यालयात विद्यार्थी यशस्वी होतील असा मला विश्वास आहे. यावेळी माजी सचिव शशिकांत देशमुख, पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी मोहदीन तांबोळी, सामना तालुका प्रतिनिधी सुदाम वराट, पत्रकार अविनाश बोधले, अशोक वीर, तुकाराम अंदुरे, दत्तात्रय पवार, पप्पूभाई सय्यद, किरण रेडे, पांडुरंग माने, साहिल भैय्या तांबोळी उपस्थित होते.