अरणगाव व जवळा परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबाग व घराचे नुकसान
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहर व तालुक्यातील अरणगाव, जवळा येथे काल शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अरणगाव, पारेवाडी व जवळा परिसरातील कांदा, फळबागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर अरणगाव येथे घरावर झाड पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. पारेवाडी येथे दोन चिंचाचे पडले आहे. अचानक जोरदार आलेल्या पावसाने शेतातून काढलेला कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मे महिन्यातील पावसाने पन्नास हजार टन पेक्षा जास्त कांद्याचे नुकसान झाले असून पंचनामे प्रलंबित आहे.
मे महिन्यात जामखेड तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला यामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे अद्याप चालू आहे. जुन महिन्यात या दोन दिवसात पुन्हा पाऊस सुरू झाला. शुक्रवारी दुपारी एक तासभर जोरदार पाऊस झाला आहे. शनिवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जामखेड शहरासह अरणगाव जवळा परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला.
अरणगाव परिसरात चिंतामण राऊत यांच्या घरावर झाड पडल्याने घराचे नुकसान झाले तसेच सिद्धेश्वर शिंदे यांच्या शेतातील लिंबोणीचा बाग वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पारेवाडी येथे मोठे चिंचाचे झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला होता. अरणगांव येथील मच्छिंद्र आंधळे यांच्या शेतातील वादळी वार्यामुळे लिंबोणी बागाचे खूप नुकसान झाले आहे. लिंबुणीचे झाडे मुळासकट उपटून पडले आहे. तहसिलदार व तलाठी यांनी या फळबागाचे पंचणामे करावीत आशी मागणी परीसरातील सर्व शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच जवळा येथेही वादळी वाऱ्यामुळे घरांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त फळबाग घराचे पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.