भारतीय सेनेच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी ब्रह्मोस मिसाइलची प्रतिकृती झाली साकार.
जामखेड येथील शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या मिरवणुकीत रहाणार खास आकर्षण
जामखेड प्रतिनिधी
जामखेड मध्ये श्री शिवराज्याभिषेत्सव समिती मार्फत 9 जून 2025 रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य मिरवणूक करण्यात येणार आहे या मिरवणुकीची सुरुवात प्रतिकृती आसलेल्या ब्रह्मोस मिसाईलचे लोकार्पण आजी-माजी सैनिक पदाधिकारी संरक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे व मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या प्रतिकृती ब्रह्मोस मिसाइल लोकार्पण सोहळा जामखेड तालुक्यातील आजी माजी सैनिकांच्या शुभहस्ते दि 9 जून 2025 दुपारी 3.30 वा छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्केट यार्ड जामखेड मध्ये होणार आहे. भारताने पाकिस्तानवर पंचवीस मिनिटात पंधरा ब्रह्मोस मिसाइल डागुन पाकिस्तानचे महत्वाचे सर्व एअर बेस नष्ट केले आणि मिशन सिंदूर यशस्वी करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेला मानवंदना देण्यासाठी श्री शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने ब्रह्मोस मिसाइलची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे व त्याची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या देशभक्ती उपक्रमामध्ये सर्व आजी माजी सैनिक, एनसीसी अधिकारी कॅडेट, शिक्षक विद्यार्थी पालक समस्त जामखेडकरांनी सहभागी व्हावे. असे श्री शिवराज्याभिषेक समितीचे पांडुराजे भोसले यांनी आव्हान केले.
तसेच उद्यासोमवार 9 जुन रोजी पहाटे सप्तनद्या, गडकोट किल्ले, तीर्थक्षेत्र येथून आणलेल्या पवित्र जलाने शिवछत्रपतींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात येईल. दुपारी 2.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती पासून श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे.