जामखेड तालुक्यात बकरीद ईद उत्साहात साजरी !
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरासह तालुक्यातील खर्डा, अरणगांव, जवळा, नान्नज, धनेगाव आणि पिंपरखेड येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामुहिक नमाज अदा केली आणि सर्वांसाठी सुख-शांतीची प्रार्थना केली.
सकाळी नऊ वाजता झालेल्या मुख्य नमाज पठणाला हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. सर्व मुस्लीम बांधवांना मौलाना मुफ्ती अफजल कासमी यांनी नमाजाचे पठन केले या पवित्र प्रसंगी त्यांनी विश्वशांती, बंधुता आणि माणुसकीसाठी प्रार्थना केली. समाजात संवाद वाढावा, प्रेम आणि सेवाभाव बळकट व्हावा, यासाठी मौलाना मुक्ती अफजल कासमी यांनी नमाज अदा करून अल्लाहकडे प्रार्थना केली.
नमाज पठणानंतर ईदगाह मैदानावर ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा ) राळेभात; पोलीस निरीक्षक महेश पाटील, सय्यक पोलीस निरिक्षक नंदकुमार सोनवलकर; पोलीस नाईक रविंद्र वाघ; पोलीस कॉ. अविनाश ढेरे; प्रकाश जाधव; योगेश दळवी; प्रकाश मांडगे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
बकरीद ईद निमित्त मुफ्ती अफजल कासमी यांनी जगातील शांततेसाठी आणि भारतातील सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी विशेष प्रार्थना केली. त्यांनी सर्वधर्मीयांनी परस्पर सहकार्य आणि सामंजस्याने पुढे जाण्याचे आवाहन करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला .
सामाजिक, राजकीय; पत्रकार बांधव आणि प्रशासनिक क्षेत्रातील व सर्व जाती धर्मातील नागरीकांनी मुस्लिम समाज बांधवांना अलिंगन देऊन ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ईदगाह मैदान, खर्डा चौक, नुराणी कॉलणी, तपनेश्वर रोड, आरोळे वस्ती, जयहिंद चौक, मस्जिदी व दर्गा या ठिकाणी कोणाताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक महेश पाटील म्हणाले की बकरीद ईदच्या कुर्बानीचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे . कोणी जर पालनाचे अवलोकन केले तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. सर्वांनी आनंदाने उत्साहात कायदयाचे पालन करून सण साजरा करावा. जामखेड तालुक्यातील सर्व मुस्लीम बांधवांनी शांततेत व मोठ्या आनंद उत्साहात बकरीद ईद साजरी केली.