शहरातील रखडलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम अदांज पत्रकानुसार सुरू करा

अन्यथा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले 29 मे पासून आंदोलन करणार

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील विश्वक्रांती चौक ते खर्डा चौक या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून रखडले आहे. पदाधिकारी, प्रशासन व ठेकेदार यांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आसुन पावसाळा सुरू झाला तरी काम अपूर्णच राहील्याने नागरिकांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने दि 29 मे पर्यंत तात्काळ अंदाज पत्रकानुसार रस्त्याचे काम न केल्यास शिवप्रतिष्ठान चे तालुकाप्रमुख पांडुराजे भोसले यांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

जामखेड शहरातुन जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाचे काम का बंद पडले आहे असा प्रश्न सध्या जामखेडकर विचारताना दिसत आहे. गेल्या अडीच वर्षापासून काम सुरु असून मुख्य रस्ता असलेला खर्डा चौक ते विश्वक्रांती चौका पर्यंतचा शहरातर्गत रस्त्याच्या कामाला मुहर्त लागेना. या रस्त्यामध्ये मुरूम टाकल्याने रस्त्याची घसरगुंडी झाली आहे. यामध्ये अनेक वाहन चालक या रस्त्यात पडल्याने दुखापत होत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सध्या जामखेडकर या रस्त्यामध्ये मरणयांतना भोगताना दिसत आहे.

विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, खासदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार आदी दिग्गज नेते असताना देखील या रस्त्याच्या कामाबाबत ते एक हि शब्द बोलत नाहीत. त्यामुळे पदाधिकारी, प्रशासन, ठेकेदाराची निष्क्रियता चव्हाट्यावर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दोन वर्षांपासून शहारातील राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले आहे. या कामामुळे नागरिकांसह वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत.

सध्या पावसामुळे रस्ता चिखलमय बनला आहे. तसेच प्रशासनाने तात्काळ रस्त्याचे काम २९ मे पर्यंत पूर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे तालुकाप्रमुख पांडुराजे भोसले यांनी दिला आहे. अतिक्रमण हटविण्याचे काम केवळ कागदावरच सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा उमटत आहे. यातून प्रशासन व ठेकेदाराची निष्क्रियता दिसुन येत आहे. प्रशासनाने २८ मार्चपूर्वी अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका, भूमिअभिलेख आणि पोलिस प्रशासन यांची संयुक्त कारवाई आखली होती. मात्र 24 मे उजाडली तरी प्रत्यक्ष कारवाईचा मागमूसही नाही. रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत बांधकामे, मोजमापाची प्रतीक्षा आणि यंत्रणांची उदासीनता यामुळे संपूर्ण प्रकल्प ठप्प झाला आहे.

पावसाळा सुरु झाल्यामुळे रस्त्यावरती चिखलाचे साम्राज्य झाले आहे. रखडलेल्या कामामुळे व हलगर्जीपणा मुळे नागरीकांचे व शालेय विद्याथ्यर्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तरी प्रशासनाने तात्काळ अदांज पत्रकानुसार रस्त्याचे काम दिनांक 29 मे 2025 पर्यंत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे तालुका प्रमुख पांडुराजे भोसले यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here