Home क्राईम न्यूज दुचाकीस्वाराकडून रस्त्यातील पाणी पायावर उडाले चार जणांकडून रिंगण करून लोखंडी रॉडने बेदम...

दुचाकीस्वाराकडून रस्त्यातील पाणी पायावर उडाले चार जणांकडून रिंगण करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण

दुचाकीस्वाराकडून रस्त्यातील पाणी पायावर उडाले चार जणांकडून रिंगण करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण

जामखेड प्रतिनिधी

मेसचे डब्बे देण्यासाठी रस्त्याने मोटारसायकल वरून जात असताना रस्त्याचे पाणी एका जणांच्या पायावर उडाले या कारणावरून चार जणांनी दुचाकीस्वाराला रिंगण करून लोखंडी रॉडने मारहाण केली. दुचाकीस्वाराचा हात फॅक्चर झाला. पोलिसांनी दुचाकीस्वाराच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या विविध दहा कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की जामखेड पोलीसात भूषण अनिल मेनकुदळे (रा. सदाफुले वस्ती जामखेड) यांनी फिर्याद दिली की, शुक्रवार दि 23 रोजी दुपारी एक वाजता मेसचे डब्बे देणेसाठी मोटारसायकल वरुन घरी जात असताना डॉ. धुमाळ यांचे जुने दवाखाण्या समोर रस्त्यावर साचलेले पाणी व चिखल यामुळे दुचाकी हळु चालवत होतो. त्यावेळी समारुन हुजेब अन्वर कुरेशी हा त्याचे मोटारसायकल वरुन येत होता. त्यावेळी माझे (फीर्यादी) यांच्या मोटारसायकालचे टायरचे पाणी त्याचे पायावार उडाले व मी घरासमोर पोहचलो त्यावेळी तो माझे पाठीमागे हुजेब कुरेशी आला व पाणी का उडवले अशी विचारणा केली असता त्यास रोडवर पाणी साचल्याने चुकुन पाणी उडाले व सॉरी बोललो यावेळी आईने हुजेब कुरेशी यास समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने आईला देखील शिवीगाळ केली व बघतो तुमच्याकडे म्हणून निघून गेला.

शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता मेसचे डब्बे घेवुन दुचाकीने जात असताना महाजन सर यांचे घराचे समोर हुजेब अन्वर कुरेशी, आयान सय्यद, (पुर्ण नाव माहीत नाही) मारुफ शेख, (पुर्ण नाव माहीत नाही) आफनान कुरेशी, (पुर्ण नाव माहीत नाही) (सर्व रा. सदाफुले वस्ती, जामखेड) व इतर दोन अनोळखी इसमानी दुचाकी आडवली त्यावेळी हुजेब अन्वर कुरेशी याने त्याचे हातातील लोंखडी रॉडने मला मारण्यास सुरवात केली. मी गाडी सोडुन पळुन जात आसताना हुजेब ने मला पकडले व खाली पाडुन माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करीत आसताना मी त्याला ढकलुन दिले. त्यानंतर वरील सर्वानी रिगंन करुन लोंखडी रॉडने हतावर, पायावर मांडीवर मारले. माझ्या ओळखीचे रमेश वराट हे तेथे आले त्यानी मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतुन सोडविले. जाताना त्यांनी आमचे नादी लागला तर तुला जीवंत सोडणार नाही असा दम देऊन म्हणून ते निघुन गेले. अशी फिर्याद भूषण मेनकुदळे यांनी दिल्यावरून पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!