“घर देता का घर” वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश– प्रशासनाकडून सर्वेक्षणासाठी अंतिम मुदत वाढविली
जामखेड प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जामखेड तालुक्यातील सर्वेक्षणाच्या प्रक्रियेबाबत वंचित बहुजन आघाडीने सुरू केलेले “घर देता का घर” आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी दिनांक 15 मे 2025 रोजी गटविकास अधिकारी शुभम जाधव यांना निवेदन देत संबंधित कामकाजात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर पंचायत समिती, जामखेड मार्फत आलेल्या पत्रात सांगण्यात आले की, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जामखेड तालुक्यात एकूण 7,455 लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये 4,474 लाभार्थ्यांचे स्वयं सर्वेक्षण झाले असून 2,981 लाभार्थ्यांचे असिस्टेड सर्वेक्षण झाले आहे. या यशस्वी आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे, प्रवक्ते बापूसाहेब ओव्हाळ, आदिवासी नेते विशाल पवार, महासचिव भिमराव सुरवसे, जिल्हा युवा संघटक अमोल उघडे, तालुका युवक अध्यक्ष रोहित सोनवणे, कार्याध्यक्ष लाला वाळके, युवक कार्यकर्ते योगेश गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, राजु शिंदे आदींनी प्रयत्न केले.
तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये सर्वेक्षणाची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे:
आगी: पात्र – 18, स्वयं सर्वे – 19, असिस्टेड सर्वे – 16
धानोरा: 41, 76, 30
चौंडी: 19, 22, 17
आपटी: 9, 61, 1
शिऊर: 16, 81, 42
धामणगाव: 15, 34, 27
जायभायवाडी: 3, 14, 0
खर्डा: 691, 207, 12
मोहरी: 29, 42, 14
मुंजेवाडी: 118, 75, 0
नाहुली: 4, 46, 12
नायगाव: 21, 57, 17
राजुरी: 101, 85, 3
सावरगाव: 21, 95, 15
यासर्व गावांतील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत 31 मे 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यानंतर कोणताही वंचित लाभार्थी शिल्लक राहणार नाही, याची प्रशासनाकडून हमी देण्यात आली आहे. त्यानुसार, वंचित बहुजन आघाडीने 26 मे रोजी आयोजित केलेले “घर देता का घर” आंदोलन प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी पत्राद्वारे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करताना प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
चौकट
वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलन यश मिळाल्याने तालुक्यातील वंचित, दलित, आदिवासी,भटके विमुक्त, ओबीसी, अल्पसंख्याक, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, भूमिहीन, गरिब अशा हजारो लोकांना मिळणार घरकुलाचा लाभ. जामखेड तालुक्यातील सत्ताधारी व विरोधी पक्ष व त्यांचे नेते फक्त निवडणूक आले की, लोकांच्या दरवाजात जातात. मोठ – मोठे आश्वासन देतात. पंरतु हक्क व अधिकाराची वेळ आली की, तोंड लपवतात.
ॲड.डाॅ.अरुण जाधव, राज्य प्रवक्ते – वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र राज्य