अवकाळी पावसामुळे जामखेड तालुक्यातील मोहरी येथे वीज पडुन बैल ठार

जामखेड प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून जामखेड तालुक्यात अवकाळी पाऊस पडत आहे. आज जामखेड तालुक्यातील मोहरी याठिकाणी शेतकरी राहुल भिसे यांच्या घराजवळ वीज कोसळून त्यांच्या एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आज देखील खर्डा, जवळा व नान्नज परीसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालंय. रविवारी देखील जामखेड तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी सायंकाळी विजांच्या कडकडाट सह खर्डा, तेलंगशी, मोहरी, धामणगाव, दिघोळ, जातेगाव, सातेफळ, नान्नज व जवळा या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.

 

जामखेड तालुक्यातील मोहरी याठिकाणी आज रविवार दि 18 रोजी सायंकाळी झालेल्या विजांच्या कडकडाट मुळे शेतकरी राहुल भिसे यांच्या घराजवळ वीज कोसळून त्यांच्या एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच नायगाव या ठिकाणी देखील शेतकर्‍याने शेतात साठवून ठेवलेल्या कांदा भिजला आसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, सध्या या कांद्याचा लाल चिखल झाला आहे. जामखेड तालुक्यात ज्या ठिकाणी शेतकर्‍याच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा ठिकाणी महसूल विभागाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांन कडुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here