

साकत घाटात ट्रक पलटी, अपघातात कीन्नर चा मुत्यू तर चालक गंभीर जखमी
जामखेड प्रतिनिधी
जामखेड सौताडा महामार्गाच्या अपुर्ण कामामुळे व खराब रस्त्यामुळे वाहतूक साकत मार्गे ये जा करतात आज रविवारी दि. १८ रोजी सकाळी अंबड जि. जालना येथून मका भरलेला बारा टायर ट्रक पुण्याच्या दिशेने चालला होता. साकत घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक घाटात पलटी झाला. यात ट्रकच्या कीन्नर चा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातात गाडीचा कीन्नर सुमित ताराचंद राठोड वय 31, मुक्काम पोस्ट मठतांडा, तालुका अंबड, जिल्हा जालना याचा मृत्यू झाला आसुन चालक केवळ शांतीलाल चव्हाण, मठतांडा, तालुका अंबड, जिल्हा जालना हा जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की आज रविवार दि 18 मे रोजी सकाळी अंबड येथून मका भरलेला ट्रक साकत मार्गे जामखेड कडे चाललेला असताना घाटात वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला यावेळी ड्रायव्हर व मदतनीस दोघांनी उड्या मारल्या यावेळी ड्रायव्हर जखमी झाला पण मदतनीस (किन्नर) यांने उडी मारली पण ट्रक त्याच्या अंगावर पडली यामुळे जाग्यावर मृत्यू झाला.

घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना मिळाल्याबरोबर कोठारी यांनी आपली रुग्णवाहिका घेऊन सोबत दीपक भोरे, विशाल ढवळे, समवेत घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्या ठिकाणी हरिभाऊ मुरूमकर, नय्युम पठाण, पाटोदा, काका मुरूमकर, बाबू सुपेकर, विशाल जोगदंड, अविनाश कदम, महेश मोळकर उपस्थित असणाऱ्या प्रवाशांनी मदत केली. यानंतर जवळील जेसीबी बोलावून ट्रक खालील मयत झालेला कीन्नर बाहेर काढला व जामखेड येथे दाखल केले.

साकत घाट अरूंद आहे. यामुळे अवजड वाहनांना टर्न बसत नाही. यामुळे नेहमीच अपघात होतात यामुळे ताबडतोब जामखेड साकत रस्ता व घाटाचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षांत जवळपास दहा अपघात या घाटात झाले आहेत. त्यामुळे घाटाचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे.






