खर्डा चौकात मंत्री विजय शहाच्या प्रतिमेला जोडे मारुन वंचित आघाडीचा निषेध

‘सैनिकाचा अपमान, संविधानाचा अपमान आहे ! – ॲड डॉ अरुण जाधव

जामखेड प्रतिनिधी (दि. १६)

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मंत्री विजय शहा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.पक्षाचे राज्य प्रवक्ते ॲड.डॉ.अरुण जाधव यांनी शहा यांच्यावर टीका करत म्हटले की, “कर्नल सोफिया कुरेशी यांचा अपमान नसून संविधानाचा,सैन्याचा आणि देशाचा अपमान आहे. अशा मंत्र्यावर त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

मध्य प्रदेशचे मंत्री कुंवर विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध नोंदवला आहे. पक्षाचे राज्य प्रवक्ते ॲड.डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाल शहरातील खर्डा चौक, जामखेड येथे ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना जाधव म्हणाले की,शहा यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा सीमारेषेवर लढावे, फालतू वक्तव्ये करून गप्पा मारू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला.“कर्नल कुरेशी यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर खंबीरपणे उभे आहेत,”असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

यावेळी लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओव्हळ म्हणाले की,एकीकडे विजय शहा हे आदिवासी व्यवहार मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळतात आणि दुसरीकडे महिला अधिकारीविषयी अशोभनीय वक्तव्य करतात. अशा व्यक्तीकडून आदिवासी समाजाच्या हिताची अपेक्षा कशी करता येईल?” याप्रकरणी न्यायालयानेही शहा यांच्या वक्तव्यावर ताशेरे ओढले आहे. भाजपकडून शहा यांच्यावर तात्काळ निलंबनाची आणि कठोर कारवाई करण्यात यावी. यावेळी संतोष चव्हाण, विशाल पवार आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओव्हाळ, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अतिश पारवे, राज्य उपाध्यक्ष भटके विमुक्त संघटना रामकृष्ण माने, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवा संघटक अमोल उघडे, वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्ते योगेश गायकवाड, आदिवासी पारधी नेते विशाल पवार, अंकुश पवार, अय्युब शेख, संतोष चव्हाण, शहानुर काळे, ऋषिकेश गायकवाड, सुविकास काळे, बिरकुट काळे, प्रदीप काळे, रोहिणी काळे, मंगल काळे, इंदुबाई काळे, सागर भोसले, रजनी बागवान, संतोष पवार, आदी मुस्लिम बांधव व महिला भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या आंदोलनाच्या माध्यमातून मंत्री विजय शहा यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याची मागे घेऊन, त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here