Home क्राईम न्यूज मंगल कार्यालयातुन नवरीसाठी आनलेले पावणेचार लाखांचे दागिने चोरीला

मंगल कार्यालयातुन नवरीसाठी आनलेले पावणेचार लाखांचे दागिने चोरीला

मंगल कार्यालयातुन नवरीसाठी आनलेले पावणेचार लाखांचे दागिने चोरीला

जामखेड प्रतिनिधी

नवरदेवाचे वडील लघुशंकेसाठी गेले असता याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मंगल कार्यालयातुन लग्नाचे सामान ठेवलेल्या ठीकाणी नवरीसाठी आनलेले सोन्याचे दागिने चोरुन नेले. यामध्ये 75 ग्रॉम वजनाचे पावणेचार लाख रुपये कीमतीचे सोन्याचे दागिने होते. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की फीर्यादी प्रताप कल्याण काकडे रा. बोर्ले, ता. जामखेड यांच्या दोन मुलांचे लग्न जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात दि 14 मे 2025 रोजी दुपारी ठेवण्यात आले होते. दुपारी लग्न लागल्या नंतर सप्तपदीचा कार्यक्रम होणार असल्याने फीर्यादी नवरदेवाचे वडील यांनी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोन्याचे दागिने ठेवलेला स्टीलचा डबा हा मंगल कार्यालयात लग्नाचे साहित्य ठेवले होते त्या ठिकाणी ठेवला होता. यावेळी ते सोन्याचा डबा ठेऊन नवरदेवाचे वडील हे लघुशंकेसाठी गेले व पुन्हा परत आले असता त्यांना सोन्याचे दागिने ठेवलेला स्टील चा डबा दिसुन आला नाही. यानंतर त्यांनी मंगल कार्यालयातील नातेवाईकांनकडे डब्या बाबत चौकशी केली मात्र सोने ठेवलेला डबा कोठे आढळून आला नाही. तेंव्हा नवरदेवाचे वडील प्रताप काकडे यांच्या लक्षात आले की आपण ठेवलेल्या स्टील च्या डब्यातील दोन्ही सुनांसाठी आनलेले दोन सोन्याचे फॅन्सी गंठण व दोन मनी गंठण आसे एकुण 75 ग्रॉम वाजनाचे 3 लाख 75 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरुन नेले आहेत.

या प्रकरणी नवरदेवाचे वडील फीर्यादी प्रताप कल्याण काकडे रा. बोर्ले ता. जामखेड यांनी दि 15 मे रोजी रात्री जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. संजय लोखंडे हे करीत आहेत.

तालुक्यातील सर्व मंगल कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

मंगल कार्यालयातील लग्न समारंभात गर्दीचा फायदा घेत अनेकदा चोरटे सोन्याचे दागिने चोरुन करुन हात साफ करतात. सध्या लग्न समारंभात चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. विशेष म्हणजे लग्नकार्यास येणाऱ्या लोकांच्या दुचाकी देखील चोरटे चोरुन नेत असल्याचे घटना घडल्या आहेत. जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक मंगल कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत याचा फायदा हे चोरटे घेत आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व मंगल मंगल कार्यालया बाहेरच्या आवारात व आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी नागरिकान कडुन होत आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!