Home क्राईम न्यूज बस मधून महिलेचे पावणे दोन लाख रुपयांचे दागिने चोरी,अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा...
बस मधून महिलेचे पावणे दोन लाख रुपयांचे दागिने चोरी,अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
नगर वरुन जामखेड येथे एस टी बसने प्रवास करत असताना फीर्यादी महीलेचे पर्स मध्ये ठेवलेले पावणेदोन लाख रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना बस मधुन महीला या उतरत असताना त्यांच्या लक्षात आला. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या जामखेड बस स्थानक हे असून अडचण नसून कोळंबा झाला आहे. या बसस्थानकाचे नवीन काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. यामुळे या बस स्थानकात प्रवाशांसाठी नीट बसण्याची व्यवस्था नाही. सर्वच प्रवासी एकाच ठिकाणी उभे राहुन बसची वाट पाहत असतात, यावेळी मोठ्या प्रमाणात बसमध्ये चढताना किंवा उतरताना लोकांची गर्दी होते. याच संधीचा फायदा जामखेड बस स्थानकामध्ये चोरटे घेत आहेत. याच अनुषंगाने फीर्यादी महीला कांता प्रकाश चौधर, वय 54 रा. डिफेन्स कॉलनी, जामखेड रोड, निबोंडी, आहील्यानगर, मुळ, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड या दि 9 जानेवारी 2025 रोजी नगरवरुन आपल्या मुळ गावी नागोबाचीवाडी या ठिकाणी पुणे-कळंब या बसने प्रवास करत होत्या. यानंतर त्यांची बस दुपारी अडीच वाजता जामखेड बस स्थानकात आली यावेळी फीर्यादी या बस मधुन उतरत असताना त्यांची बॅग मध्ये सोने ठेवलेली पर्स चोरीस गेलेली लक्षात आली. या पर्स मधिल तीन तोळा वजनाचे गंठण, सोन्याचा नेकलेस, कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने असे एकुण 1 लाख 71 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. चोरीची घटना जरी बस मध्ये घडलेली असली तरी सध्या सणानिमित्त बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. याठिकाणी कायम स्वरूपी एक पोलीस कर्मचारी नेमावा ही मात्र प्रवाशांची जुनीच मागणी आहे.
या प्रकरणी फिर्यादी महीला यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दि 10 जानेवारी 2025 रोजी फीर्याद दाखल केली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रविण इंगळे हे करत आहेत.
error: Content is protected !!