जामखेड सौताडा या रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे अपघातांची मालिका थांबेना
रोडचा अंदाज न आल्याने आपघातात २३ वर्षीय युवक गंभीर जखमी
जामखेड प्रतिनिधी
जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या वर्षी पासुन रखडले असल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे या रस्त्यावरील अपघातांची मालिका थांबायला तयार नाही. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आसुन मध्यरात्री एक दुचाकीस्वारास येथील ढीगाऱ्याचा अंदाज न आल्याने आपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. आपघाताची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी मध्यरात्री कडाक्याच्या थंडीत जाऊन जखमीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.