Home ताज्या बातम्या पर्यावरणाचा होणारा -हास थांबवण्यासाठी प्रदुषण थांबवणे ही काळाची गरज – न्यायाधीश विक्रम...

पर्यावरणाचा होणारा -हास थांबवण्यासाठी प्रदुषण थांबवणे ही काळाची गरज – न्यायाधीश विक्रम आव्हाड

पर्यावरणाचा होणारा -हास थांबवण्यासाठी प्रदुषण थांबवणे ही काळाची गरज – न्यायाधीश विक्रम आव्हाड

जामखेड प्रतिनिधी

पर्यावरणाचा होणारा -हास थांबवण्यासाठी होणारे प्रदुषण थांबवणे ही काळाची गरज बनली असून, त्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते करावे असे आवाहन न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी केले आहे.

पिंपळगाव जलाल (ता.येवला) येथील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेमार्फत पिंपळगाव जलाल व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानाने पिंपळगाव जलाल ते अहमदनगर, जामखेड, खर्डा, येरमाळा, तुळजापूर , अक्कलकोट ते गाणगापूर सायकल यात्रेचे गेली १९ वर्षापासून दरवर्षी आयोजन करण्यात येते. या सायकलयात्रेचे सोमवारी (ता.१४) जामखेडला सायंकाळी आगमन झाले. यावेळी जैन कॉन्फरन्स, कोठारी प्रतिष्ठान जामखेड आणि समर्थ हॉस्पिटल जामखेड वतीने राज लॉन्स येथे विशेष स्वागत सभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या यात्रेत सहभागी असलेले न्यायाधीश आव्हाड बोलत होते.

तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्वागत सभारंभास धर्मादाय आयुक्त बाबासाहेब शेकडे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे, न्यायाधीश संगीता आव्हाड, कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद राऊत वसंत लोढा, राजेंद्र बरदोटा, रोशन चोरडिया, पवन कटारिया, डॉ. भरत दारकुंडे, उद्योजक प्रवीण मंडलेचा, कांतीलाल कोठारी, अशोक चोरडिया, प्रदिप मंडलेचा, मयूर भोसले, प्रफुल्ल सोळंकी, सेवानिवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, धनंजय भोसले, किरण शिंदे, दिगंबर चव्हाण, सुमित चानोदिया, सचिन गाडे, किशोर गांधी, तेजस कोठारी संकेत कोठारी, रोहन कोठारी, दीपक भोरे, सुभाष भंडारी, सुभाष भळगट, प्रकाश टेकाळे, पोलीस शरद टेकाळे, अमोल लोहकरे, ॲड. अक्षय वाळुंजकर ॲड. अजिनाथ जायभाय, ॲड. अमोल जगताप उपस्थित होते.

यावेळी न्यायाधीश विक्रम आव्हाड म्हणाले, मी गेले १९ वर्षापासून जामखेडमध्ये येत आहे. सुरुवातीला आम्ही दोन-तीन जणच होतो. आता आमच्या बरोबर ४५ महिला पुरुष सायकलवर येत आहेत. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचेमार्फत आमचे होणारे स्वागत आम्हाला प्रोत्साहन देणारे असते. असे त्यांनी सांगीतले.

तहसीलदार गणेश माळी म्हणाले, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी मी गेल्या वर्षापासून कार्य पाहत आहे या माणसाला थकवाच नाही.सायकल यात्रेतील सर्व लोकांचे स्वागत करतानाच, राहण्याची जेवणाची सोय कोठारी यांचेमार्फत होत असून, हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे.

यावेळी वसंत लोढा, सायकलयात्रेचे आयोजक विजय भोरकडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय भोसले यांनी तर आभार संजय कोठारी यांनी मानले. या सायकल यात्रेत ७८वर्षाचे आजोबा आणि ६७ वर्षाच्या आजीही सहभागी झाल्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!