शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी समीर शेख व उपाध्यक्षपदी महावीर मेहेर यांची निवड
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नान्नज मुली या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी समीर शेख तर उपाध्यक्षपदी महावीर मेहेर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक विकास बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालक बैठकीत पालकातुन शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित सदस्य यांची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी समीर शेख व उपाध्यक्ष पदी महावीर मेहेर यांची निवड करण्यात आली सर्व निवडी खेळीमेळीच्या वातावरणात एकमताने पार पडल्या.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बगाडे यांनी शालेय कामकाज बद्दल माहिती व शाळा व्यवस्थापन समिती चे कामाबद्दल माहिती दिली.
नवनिर्वाचित अध्यक्ष शेख व उपाध्यक्ष मेहेर यांचे शाळेच्या वतीने संरपच महेंद्र मोहळकर व मुख्याध्यापक विकास बगाडे, बाबासाहेब कुमटकर, सोनवणे, खोसे, पालक यांनी सत्कार केला या पालक मेळाव्याला रणजित मोहळकर, मझर पठाण, बाळु मोहळकर, अस्लम शेख, भिमा मोहळकर, त्रिंबक मोहळकर, मनोज गाडेकर, शांतीलाल साळवे, मनोज हजारे, अमोल साठे, सुधीर साठे, दिपक भवाळ, अकील शेख, कय्युम शेख, राम कोळपकर, समीर टेलर, सुनील साठे आदी पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष समीर शेख यांच्या निवडीबद्दल पोलीस बॉईज असोसिएशन जामखेड व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जामखेड तालुका यांच्या वतीने सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाचे आभार बाबासाहेब कुमटकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here