प्रारूप विकास आराखडा विरोधात बचाव कृती समितीच्या वतीने आज जामखेड शहर कडकडीत बंद
जामखेड प्रतिनिधी
जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीने “चला जामखेड वाचवू या ” या टँगलाईन खाली अन्यायकारक प्रारूप विकास आराखडा हाणून पाडा म्हणत विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीने आज मंगळवार दि 27 ऑगस्ट रोजी जामखेड बंदचे आवाहन करण्यात आले होते. याला शहरातील व्यापारी व नागरिकांनी जामखेड शहर कडकडीत बंद ठेवत प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीला पाठिंबा दिला आहे.
यावेळी बोलताना उद्योजक आकाश बाफना म्हणाले की, आज व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त पणे दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला आहे.हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. प्रशासन व दोन्ही आमदार यांनी विकास आराखडा पुनर्विचार करण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू असे सांगितले. यावेळी विनायक राऊत म्हणाले की. प्रारूप विकास आराखडा पुनर्विचार करण्यासाठी आपण न्यायालयीन लढाई व आंदोलन दोन्ही मार्गाचा वापर करत आहेत. तसेच नियोजनासाठी शनी मंदिरात सायंकाळी सात वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा हे समजावून घ्या. अमित चिंतामणी म्हणाले की, कोणतीही पूर्वसूचना न देता विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा विकास आराखडा रद्द करून नवीन नगरसेवक झाल्यावर सर्वाना विश्वासात घेऊन नवीन आराखडा बनवू आहे सांगितले.प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, हा प्रारूप विकास आराखडा शहराला परवडणारा नाही. मुख्य रस्ता 150 फूट होत आहे यामुळे अनेक इमारतींना धोका होणार आहे. शहरातील पंधरा हजार लोक बाधित होणार आहेत. चारशे मीटरवर रिंग रोड होणार आहे यामुळे ताबडतोब पुर्नविचार करावा अशी मागणी केली आहे.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती कैलास वराट, उद्योजक रमेश आजबेआजबे यानीही आपले मत मांडले जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समिती तयार पुढील प्रमाणे तयार करण्यात आली आहे.
प्रा. मधुकर आबा राळेभात (अध्यक्ष), आकाश दिलीपशेठ बाफना (कार्याध्यक्ष), ॲड. शमा हाजी काझी साहेब (उपाध्यक्ष ), अमित अरुणशेठ चिंतामणी (उपाध्यक्ष), विनायक विठ्ठलराव राऊत (सचिव), राहुल अंकुश उगले (सहसचिव), अविनाश दशरथ साळुंके (खजिनदार), अमोल रमेश गिरमे (समन्वयक), सन्मानीय सदस्य अशोक जावळे, डॉ. संजय राऊत, राजेंद्र देशपांडे सय्यद जावेद अली, विजय गव्हाणे हे जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीत आहेत.
जामखेड शहराचा विकास झालाच पाहिजे या दृष्टिकोनातून प्रारूप विकास आराखडा होणे अपेक्षित होते. जामखेड नगरपरिषद प्रशासनाने व नगर रचना विभागाने सध्या तयार केलेला आराखडा हा शहराच्या विकासाच्या अनुषंगाने नसून जामखेड शहर भकास करण्याचा हा आराखडा आहे. जामखेड शहरातील गोरगरीब, कष्टकरी, व्यापारी, नोकरदार, शेतकरी, पदवीधर सर्व क्षेत्रातील बहुसंख्य शहरवासीयांच्या विरोध असून या आराखड्या विरोधात जामखेड कर जन आंदोलन उभे करत आहेत, जामखेड शहरातील किमान १५००० लोक बाधित होत आहेत त्यांना अंधारात ठेवून नगर परिषद हा आराखडा लोकांवर लादत आहे. आणि यासाठी समस्त जामखेडकर न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी व हा अन्यायकारक आराखडा रद्द करुन जामखेडकरांना विश्वासात घेऊन नवनियुक्त नगरपरिषद पदाधिकारी यांची निवड झाल्यावर नव्याने आराखडा बनवावा ही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आज कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीने नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना निवेदन देण्यात आले.