सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली जखमी रुग्णास मदत
जामखेड प्रतिनिधी
जामखेड मध्ये पावसात रस्त्यावर पडलेल्या एका व्यक्तीस वेळीच औषधो उपचारास हॉस्पीटल मध्ये दाखल करुन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी रुग्णास मदत केली.
रविवार दिनांक १८/८/२०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता अजिंक्यदेवा कुलकर्णी यांच्या फोन वरून मिळालेल्या माहीती वरून सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जामखेड स्टॅंडवर पावसामध्ये रस्त्याच्या कडेला आणि ‘गटरीच्या स्लॅबवर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका वयोवृद्ध इसमास सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून जामखेड येथील खाजगी हॉस्पीटल मध्ये दाखल करत त्याची मदत केल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. चौकशी वरून सदर इसमाचे नाव जयराम जानू विधाटे वय ७७ मुक्काम पोस्ट करेवडगाव तालुका आष्टी जिल्हा बीड असे असल्याचे समजते आहे तर सदर अत्यावस्थ इसमावर ताबडतोब उपचार करण्यात आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आत्तापर्यंत हजारों लोकांचे प्राण वाचवले आहेत आज कोठारी यांचे ६१ वय चालू असून ते अशा कामात थकत नाहीत गोरगरिबांना मदत करण्यात हॉस्पिटलचे बिल भरण्यास पैसे नसल्यास संजय कोठारी हे सदरील हॉस्पिटलच्या डॉक्टरांना विनंती करून बिल कमी करण्यात सर्वात पुढे असतात त्यांना या कामी अजिंक्य कुलकर्णी (देवा), बाळासाहेब आमटे, बाळासाहेब जाधव, अशोक शेंगटे आदींनी मदत केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here