Home ताज्या बातम्या श्रीगोंदा शिरूर रस्त्यावरील भिषण अपघातात ४ जण ठार, ३ गंभीर जखमी, श्रीगोंदा...

श्रीगोंदा शिरूर रस्त्यावरील भिषण अपघातात ४ जण ठार, ३ गंभीर जखमी, श्रीगोंदा तालुक्यातील घटना

श्रीगोंदा शिरूर रस्त्यावरील भिषण अपघातात ४ जण ठार, ३ गंभीर जखमी, श्रीगोंदा तालुक्यातील घटना
जामखेड प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा शिरूर रस्त्यावर ढवळगाव शिवारात आज दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान एसटी बस आणि एर्टिगा कार यांच्यात समोरा समोर झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार झाले आहेत तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एकादशी निमित्ताने आळंदी येथे माऊलींच्या दर्शनाहुन परतत असताना या भाविकांच्या गाडीला हा भिषण अपघात घडला आहे. या बाबत सविस्तर मिळालेल्या माहिती नुसार श्रीगोंदा डेपो मधील श्रीगोंदा बेलवंडी शिरूर एस टी क्रमांक एम एच १४ बी टी ०८७३ आणि एर्टिगा कार क्रमांक एम् एच १२ टी वाय ४३५२ ही आळंदी येथून देव दर्शन करून पारगाव सुद्रीक (श्रीगोंदा) येथे येत होती. तर श्रीगोंदा डेपोची गाडी शिरूर येथे जात असताना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ढवळगाव परिसरातील कूकडी चारी क्रमांक ३४ च्या वळणावर समोरासमोर जोरदार धडक होऊन एर्टिगा कार मधील पारगाव सेवा संस्थेचे व्हा. चेअरमन विश्वनाथ लक्ष्मण ननवरे वय ५५, पारगाव सेवा संस्थेचे सदस्य हरी तुकाराम लडकत वय ६०, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बापूराव मडके वय ५५, दत्तात्रय बळीराम खेतमाळीस वय ६० हे चार जण जागीच ठार झाले आहेत.
तर कारमधील गंभीर जखमी झालेल्या तिघांपैकी ड्रायवर विठ्ठल गणपत ढोले वय ३६ रा. लोणी व्यंकनाथ, रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस वय ७० या दोन जणांना शिरूर येथील खाजगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे तर रोहिदास सांगळे वय ७२ यांना ढवळगाव येथील आनंदवन येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.
जखमी तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत. सदर घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी दवाखान्यात हलविले. घडलेल्या घटनेमुळे पारगाव सूद्रिक गावावर शोककळा पसरली आहे.
एकादशी असल्याने पारगाव येथील आठ जण आळंदी येथे माऊलींच्या दर्शनासाठी गेलेले होते. दर्शन झाल्यानंतर गाडी मधील गोपीनाथ हिरवे हे मुलाला भेटण्यासाठी पुणे येथे जाणार असल्याने आळंदी येथेच उतरल्याने उर्वरित सात जन घराकडे माघारी येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. तर हिरवे यांचे नशीब बलवत्तर असल्याने त्यांच्या बाबती मध्ये काळ आला होता पण वेळ आली नसल्याने माउलींनी त्यांना आळंदी येथे उतरून घेतले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!