पोहण्यासाठी गेलेल्या १० वर्षाच्या मुलीचा पायऱ्यावरुन पाय घसरला, जखमी होऊन विहीरीतील पाण्यात पडल्याने बुडून झाला मृत्यू
जामखेड प्रतिनिधी
पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षाच्या मुलीचा पायऱ्यावरुन पाय घसरल्याने खालच्या पायरीवर पडुन गंभीर जखमी होऊन पुन्हा विहीरीतील पाण्यात पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मुत्यू झाला. या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, खर्डा येथील मुलीची वडील ज्ञानेश्वर हरिभाऊ काशीद यांनी पोलीस स्टेशनला खबर देऊन माहिती दिली की, दिनांक 4 मे 2024 रोजी दुपारी 2 वाजता मी व माझी मुलगी असे आम्ही दोघेजण पोहत होतो त्यानंतर मी कामानिमित्त गावात आलो. परंतु मुलगी कु. सानिका ज्ञानेश्वर काशीद वय 10 वर्षे ही ओंकारेश्वर मंदिरासमोरील पुरातन काळातील बारवात पुन्हा पोहत असताना ती वरती येऊन पुन्हा पोहण्यासाठी उडी मारताना तिचा दगडी पायऱ्याला शेवाळ असल्यामुळे पाय घसरून ती खालील दगडी पायरीवर पडल्याने तिच्या डोक्याला मार लागून ती पाण्यात पडून बुडाली, त्यानंतर ती पाण्याच्या वर न आल्याने शुक्रवार पेठेतील पोहणाऱ्या मुलांनी एक ते दीड तास प्रयत्न करून तिला वर आणण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा शोध घेण्यास अडचण येत होती.

त्याच वेळी ही वार्ता खर्डा शहरात पसरली यावेळी महिलांनी व लोकांनी त्या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. त्यानंतर अनिल गोपाळघरे या धाडसी युवकाने पाण्यात खोल बुडी घेऊन कु. सानिकाला बाहेर काढले परंतु डोक्याला मार लागल्याने व तिला पोहता आले नाही त्यामुळे तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यावेळी आई व कुटुंबाचा रडण्याचा प्रचंड आक्रोश झाला.

त्यावेळी उपस्थित जनसमुदायाचे सुद्धा मन हेलावून गेले. होते. यावेळी सानिका काशीद हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला, कु. सानिका काशीद हीला पोहता येत असूनही तिचा मृत्यू झाल्याने खर्डा शहरावर शोककळा पसरली आहे. तिच्या मागे आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जायभाय पोलीस नाईक संभाजी शेंडे पोलीस कॉन्स्टेबल शेषराव म्ह हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here