भाजपने मारली बाजी, नगराध्यक्षासह १५ उमेदवार विजयी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ५ तर इतर पक्षाचे ४ विजयी

जामखेड प्रतिनिधी

कर्जत-जामखेडच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत भाजपच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) उमेदवार संध्या राळेभात यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला आहे. आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यातील थेट संघर्षात जामखेडच्या मतदारांनी राम शिंदेंच्या नेतृत्वावर मोहोर उमटवली आहे.

नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही भाजपची लाट पाहायला मिळाली असून, एकूण जागांपैकी तब्बल १५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे नगरपरिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत सिद्ध झाले आहे. दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले, वंचित बहुजन आघाडी २, एकनाथ शिंदे शिवसेनेला १ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जाग मिळाली आहे.

संपूर्ण निवडणूक प्रचारात दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या, मात्र अंतिमतः जामखेडकरांनी भाजपला पसंती दिली. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी “राम शिंदे आगे बढो”च्या घोषणा देत शहरात मोठा जल्लोष साजरा केला असून, या विजयाचे मुख्य शिल्पकार आमदार राम शिंदे असल्याचे मानले जात आहे.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे आहेत

नगराध्यक्षा पदासाठी भाजपाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी यांचा ३६८२ मतांनी विजय झाला आहे.

तर नगरसेवक पदासाठी पुढील उमेदवार विजयी आहेत.

प्रभाग एक-अ) सुमन शेळके ( भाजपा)
ब) श्रीराम डोके (भाजपा)

प्रभाग दोन- अ) अँड प्रविण सानप (भाजपा)
ब) प्रिती प्रशांत राळेभात ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

प्रभाग तीन – अ) पोपट दाजीराम राळेभात (भाजपा)
ब) सिमा रवींद्र कुलकर्णी (भाजपा)

प्रभाग चार- अ) विकी घायतडक (भाजपा)
ब)प्रांजल अमित चिंतामणी (भाजपा)

प्रभाग पाच अ) हर्षद काळे (भाजपा)

ब)वर्षा कैलास माने (शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष)

प्रभाग सहा- अ) डॉ. अँड.अरूण जाधव (वंचित बहुजन आघाडी)
ब) संगिता भालेराव (वंचित बहुजन आघाडी)

प्रभाग सात – अ) नंदा प्रविण होळकर (भाजपा)
ब) मोहन पवार (भाजपा)

प्रभाग आठ- अ) हिना सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
ब) राजू गोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

प्रभाग नऊ – अ) वैशाली अर्जुन म्हेत्रे (भाजपा)
ब) तात्याराम पोकळे (भाजपा)

प्रभाग दहा – अ) मेहरुन्निसा कुरेशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
ब) वसिम सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

प्रभाग आकरा – अ) संजय काका काशिद (भाजपा)
ब)आशाबाई टकले (भाजपा)

प्रभाग बारा – अ) महेश निमोणकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष)

ब) जया संतोष गव्हाळे (भाजपा)

चौकट

वंचित बहुजन आघाडीने आपले खाते उघडत २ जागी विजय संपादन केला आहे. प्रभाग सहा- अ) डॉ. अँड. अरूण जाधव (वंचित बहुजन आघाडी) ब) संगिता भालेराव (वंचित बहुजन आघाडी) विजय संपादन केला आहे. भाजपचे नगराध्यक्षासह १५ उमेदवार विजयी झाले आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ५ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा १ उमेदवार, तर शिवसेना शिंदे गटाचा १ आसे उमेदवार विजयी झाले आहेत.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here