क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
विविध कार्यक्रमाचे व मिरवणूकीचे करण्यात आले आयोजन
जामखेड प्रतिनिधी
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवानिमित्त जामखेड शहरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिरात एकुण १२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच पुढील दोन दिवस विविध कार्यक्रमाचे होणार असुन भव्य मिरवणूकीचे देखील आयोजन करण्यात आली आसल्याची माहिती. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती जामखेड च्या वतीने देण्यात आली आहे.
आज बुधवार दिनांक अहमदनगर येथील सुरभी ब्लड बँकेच्या सहकार्याने व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती जामखेड च्या वतीने जामखेड शहरातील संविधान चौक याठिकाणी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन जामखेड चे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या शिबिरात एकुण १२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
तसेच याच दिवशी सायंकाळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर एक छोटेसे महानाट्य आयोजित केले आहे. यानंतर सात वाजता शाहीर अरविंद घोगरे पाटील यांचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अविष्यावर पोवार होणार आहे. गुरवार दि ११ एप्रिल रोजी सकाळी मुर्तीपुजन होणार आहे. दुपारी तीन वाजता जामखेड शहरातील संविधान चौकापासून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत वारकरी पथक शिवकालीन मर्दानीखेळ व हलगी पथक असुन मिरवणूक ही पारंपरिक वाद्यात निघणार आहे. मिरवणूकीनंतर विठ्ठल मंदिर या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.