खा. सुजय विखेंना नगर दक्षिण मधून मोठ्या मताधिक्याने निवडुन आणायचे आहे.
कार्यकर्त्यांनो कामाला लागा, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आ. प्रा राम शिंदेनी आदेश
जामखेड प्रतिनिधी
पक्षाने दिलेला आदेश आम्ही पाळतो कारण यादेशात तिसर्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. यासाठी खा. सुजय विखेंना खासदार करण्यासाठी कार्यकर्त्यांनो कामाला लागा व मोठ्या मदाधिक्याने खा. विखेंना निवडून आणायचे आहे आसे देखील आदेश कर्जत जामखेड चे आ. प्रा राम शिंदे यांनी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पत्रकार परिषदेत दिले.
आमदार प्रा. राम शिंदे, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील तसेच जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जामखेड येथे मंगळवार दि २ रोजी दुपारी लोकसभा निवडणुकीच्या आनुशंगाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परीषदेच्या आगोदर जामखेड येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे लोकसभा निवडणुक प्रचार व नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. तीन तासांच्या बैठकी नंतर आ. प्रा राम शिंदे व खा. सुजय विखे यांच्या मध्ये आसलेले मदभेत तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नाराजी दुर झाली आसल्याचे सांगण्यात आले.
पुढे बोलताना आ. प्रा. राम शिंदे म्हणाले की पक्षाने आदेश दिल्या नंतर आमच्या मध्ये मतमतांतरं होऊ शकत नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली खा. सुजय विखेंना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. अहील्यानगर दक्षिण मधून खा. सुजय विखेंना तिकीट फायनल झाल्यावर आम्ही सर्व भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत खा. सुजय विखेंचा सत्कार केला आहे.
यानंतर खा. सुजय विखे यांनी बोलताना सांगितले की अहील्यानगर जिल्ह्यातील रस्ते गतीमान झाले आहेत. सध्या टंचाई आसल्याने टॅंकर बाबत प्रशासन स्तरावर निर्णय घेतला जाईल. जामखेड ते सौताडा या रस्त्याच्या बाबत दोन ठेकेदार बदलले आहेत. तरी देखील काम संथ गतीने सुरू आहे त्यामुळे ठेकेदारने हलगर्जीपणा केला आसल्यास जुना कॉन्ट्रॅक्टर रद्द करुन नवीन निविदा काढुन नवा ठेकेदार देण्यात येईल आसे देखील खा. सुजय विखेंनी सांगितले.
यावेळी खा. सुजय दादा विखे, आ. प्रा. राम शिंदे जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, तालुका अध्यक्ष अजय (दादा) काशिद, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, नगरसेवक अमित चिंतामणी, सोमनाथ राळेभात, सोमनाथ पाचरणे, भारतीय जनता पार्टी चे उपाध्यक्ष बापुराव ढवळे, सरपंच वैजनाथ पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस लहु शिंदे, पांडुरंग उबाळे, बाळासाहेब गोपाळघरे, पवन राळेभात, बिबीशन धनवडे, गणेश जगताप, राजेंद्र ओमासे, राहुल चोरगे, दत्ता गीरी, पाडुरंग माने, शिवकुमार डोंगरे, तुषार बोथरा सह अनेक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.