जामखेड शहराध्यक्ष पवनराजे राळेभात यांनी केली भाजप शहर कार्यकारणी जाहीर
जामखेड प्रतिनिधी
आ. प्रा. राम शिंदे व जिल्हाध्यक्ष भालसिंग यांच्या आदेशानुसार व खा. डॉ. सुजय (दादा) विखे पाटील आणि अक्षय कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली व आदेशाने ही कार्यकारीनी जाहीर करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, शहराध्यक्ष पवनराजे राळेभात, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे यांनी कार्यकारणी जाहीर केली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी शहरअध्यक्ष पवनराजे राळेभात यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा वारसा घेऊन आ. प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यातील निवड केलेले सर्व युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षासाठी झोकुन काम करणार आहेत.
भाजप शहर कार्यकारणी जामखेड मध्ये प्रा. जाकीर ताजोदिनिन शेख यांची कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर सरचिटणीस पदी श्रीराम अजिनाथ डोके, हर्षल हेमंत देशमुख, बाळासाहेब साहेबराव गायकवाड,
प्रवीण बबनराव बोलभट, दत्तात्रय भीमराव ढवळे, यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी आकाश विठ्ठल पिंपळे, शिवाजी ज्ञानदेव विटकर, अशोक चंपालाल बाफना, शिवकुमार महादेव डोंगरे, अर्जुन मारुती म्हेत्रे,किरण पांडुरंग आजबे, कालिदास प्रकाश मगर, अविनाश सुग्रीव कदम, कल्याण चत्रभुज हुलगुंडे यांची निवड करण्यात आली आहे.
चिटणीस पदी उमेश कैलास डोके, विलास नाथा शिरगिरे, अनिकेत सुरेश जाधव, विशाल दादासाहेब रिटे, रवी छबू डाडर, सय्यद साजिद जाकीर, नितीन सुभास खेत्रे, सागर गोकुळ परदेशी यांची निवड करण्यात आली आहे तर राजू अंकुश गवळी यांची सोशल मिडीया प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. अशा एकुण २५ जणांची विविध पदावर निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here