जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीची जम्बो कार्यकारीनी जाहीर
जामखेड प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकिच्या अनुषंगाने आ. प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत घेऊन पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तालुक्यातील १७५ निष्ठावंत युवकांची जम्बो कार्यकारीनी जाहीर केली आहे.

तालुक्यातील होतकरू तळागाळातील कार्यकर्ते सक्रीय करण्यासाठी व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व निवडणूकीत पक्षाचे ध्येय धोरणे सर्व सामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने एकशे पंच्याहत्तर पदाधिकारी यांची जंब्बो कार्यकारीनी जाहीर केली आहे. आ. प्रा राम शिंदे व जिल्हाध्यक्ष भालसिंग यांच्या आदेशाने ही कार्यकारीनी जाहीर करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, युवक तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, शहराध्यक्ष पवन राळेभात, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे यांनी जाहीर केली.
जामखेड शहरात नुकतच पत्रकार परिषदेत घेत ही कार्यकारीनीची घोषणा करण्यात आली. तसेच लोकसभा निवडणूकीत तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणार आहे नेते व कार्यकर्ते यांच्यामधे धुसफूस सुरू होती याच संदर्भात आज खा. सुजय विखे, आ. राम शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष आजय काशिद यांनी सांगितले.
मागील कार्यकारिणी निवडीवेळी प्रचंड दहशत होती. अनेक कार्यकर्ते दडपणाखाली होते अनेक जण मनाने भाजपात तर शरीराने दुसऱ्या पक्षात गेले होते. आता परत घरवापसी झाली आहे. तेव्हा आम्ही निष्ठावान, ग्रामीण भागातील तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. येणाऱ्या सर्वच निवडणुकीत याचा चांगला परिणाम दिसणार आहे.
भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी आपल्या कार्यकारीमध्ये पाच सरचिटणीस, एक कोषाध्यक्ष अकरा उपाध्यक्ष, अकरा चिटणीस, आहेत, आमदार प्रा. राम शिंदे, डॉ. भगवानराव मुरूमकर, रवी सुरवसे, सोमनाथ पाचरणे, शरद कार्ले, प्रविण सानप, वैजनाथ पाटील विष्णू भोंडवे सह पन्नास जण कायम निमंत्रित सदस्य आहेत. यामध्ये एकुण ९५ जणांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी आमदार प्रा राम शिंदे, खासदार सुजय विखे पाटील, अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली तीन सरचिटणीस, दहा उपाध्यक्ष, एक कोषाध्यक्ष, दहा चिटणीस, एक सोशल मीडिया प्रमुख, एक प्रसिद्धी प्रमुख, व एक सुप्रसिद्धी प्रमुख, अकरा निमंत्रित सदस्य आसे एकुण ३८ जणांना संधी देण्यात आली आहे.
भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात यांनी जामखेड शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये कोषाध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष चीटणीस सोशल मिडीया प्रमुख आशा एकुण २५ जणांना संधी देण्यात आली आहे. जामखेड तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष विष्णू गंभिरे यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात तीन सरचिटणीस, सहा उपाध्यक्ष, सहा चिटणीस, एक प्रसिद्धी प्रमुख, एक शहराध्यक्ष व एक शहर सरचिटणीस अशी एकुण १८ जणांची कार्यकारिणी जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here