कालिका पोदार लर्न स्कूल जामखेड येथे मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा
जामखेड प्रतिनिधी,
कालिका पोदार लर्न स्कूल जामखेड येथे मराठी राजभाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शहरातुन फेरी काढत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवावर अधारीत आसलेली नाटीका विद्यार्थ्यांनी सादर केली होती.
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. याच आनुशंगाने सर्व ठिकाणी दि २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समिक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढविण्यात महत्वपूर्ण योगदान दिले.
याच आनुशंगाने जामखेड मध्ये विविध ठिकाणी कालिका पोदार लर्न स्कूल च्या वतीने ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता पाचवीतील मुला- मुलिंनी ढोल-लेझिम यावर ठेका धरला, त्यानंतर इयत्ता सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिवकाळ दर्शवला, त्यानंतर ग्रंथपालखी, नंतर संत महिमा व शेवटी हातामध्ये मराठी चा गौरव घेऊन चाललेले इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी- विद्यार्थीनी प्रभात फेरी मध्ये सहभागी झाले होते.
जामखेड मध्ये शितल कलेक्शन समोर नगररोड, शनीमंदिरासमोर मेन (पेठ), तहसील कार्यालय रोड या ठिकाणी मराठी दिना निमित्त विविधरंगी कार्यक्रम पार पडला . त्यामध्ये विद्यार्थ्यांनी संत वांड्मयातील विविध रंगाची उधळन प्रेक्षकांवर केली. भारूड, ओवी, अभंगातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. आणि त्यानंतर शाहिरी काव्य, ज्वलंत शिव महिना, आणि मराठी साहित्या मुरलेल्या धनगरी ओवीला शाहिरीसाज देऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आणि आपल्या मराठी संस्कृती बरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य डोळ्यासमोर उभे राहिले.
error: Content is protected !!