ल. ना. होशिंग विद्यालयात मराठी गौरव दिन विविध कार्यक्रमांनी केला उत्साहात साजरा
जामखेड प्रतिनिधी
ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या भुमिका करत इतिहासाला उजाळा दिला. याचबरोबर विद्यार्थ्यांनी विविध भूमिका वटवल्या तसेच गीत गायन, नृत्य यांचे सादरीकरण केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दी पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी तर प्रमुख पाहुणे म्हणून खजिनदार राजेश मोरे, जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम एल डोंगरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य पोपट जरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पारखे, पर्यवेक्षक पी. टी. गायकवाड यांच्या सह सर्व विद्यार्थी व शिक्षक पालक मोठ्या संख्येने हजर होते.
ल ना होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व अध्यापक प्राध्यापक शिक्षकेत्तर बंधूभगिणी यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करून नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीरित्या सर्व गीते, संवाद सादरीकरण करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कलाशिक्षक मुकुंदजी राऊत यांनी विद्यार्थ्यांना उत्तमपणे शोभिवंत केले. छत्रपती शिवराय व संत तुकाराम महाराज यांच्या भूमिका श्रोत्यांच्या हृदयावर कोरणारे साईराज भोसले व शशिकांत सदाफुले यांनी त्यांच्या अंगभूत कलागुणांचा साक्षात्कार दाखवत विद्यालयातील शिक्षकांच्या कलेची उंची उत्तुंगपणे दाखविली.
विद्यार्थ्यांनी सर्व पात्रे, भूमिका, गीत गायन, नृत्य यांचे जबरदस्त सादरीकरण करून कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांची मने जिंकली. प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी मराठी दिनानिमित्त “सुंदर पालखी ” विद्यालयास बहाल करून कायम स्वरुपाची संस्मरणीय भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख अनिल देडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here