

राष्ट्रीय महामार्ग 548-D प्रकरणी सुरू असलेल्या उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा जाहीर पाठिंबा
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-D लगतची अतिक्रमणे व कामातील अनियमिततेविरोधात सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी सुरू केलेल्या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

शहराच्या सुरक्षिततेचा, व्यापारी पेठेच्या हिताचा आणि पारदर्शक विकासाचा प्रश्न लक्षात घेता हे आंदोलन रास्त असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. राष्ट्रीय महामार्गालगतची पक्की अतिक्रमणे हटविणे, मंजूर आराखडा सार्वजनिक करणे तसेच कामातील अनियमिततांची सखोल चौकशी करणे, या मागण्या योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने तात्काळ सकारात्मक भूमिका घेऊन अतिक्रमणांविरोधात ठोस कारवाई करावी, अन्यथा पक्ष तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, शहाजी काका राळेभात, सरपंच बाप्पुसाहेब कार्ले, अमर चाऊस, पत्रकार दत्तराज पवार, रंगनाथ राळेभात, हनुमंत मोरे, दीपक घायतडक, राळेभात, संभाजी मुळे, गणेश ढगे आदी उपस्थित होते.

जामखेड शहरातील अनाधिकृत अतिक्रमण झाले असल्याने वहान चालक व नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याच आनुशंगाने सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार हे साखळी उपोषण बसले आहेत. साखळी उपोषणाचा पाचवा दिवस आसुन अत्तापर्यंत विविध स्तरांतून अवदुत पवार यांच्या साखळी उपोषणास पाठिंबा मिळत आहे. अत्तापर्यंत सर्व पक्षीय पाठींबा मिळाला आहे. तसेच जामखेड तालुका बचाव कृती समिती, जामखेड तालुका वकील संघ, वंचित बहुजन आघाडी, त्रीदल माजी सैनिक संघटना जामखेड, डॉक्टर असोशिएशन जामखेड, व संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र यांनी देखील उपोषण स्थळी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला आहे.







