अतिक्रमणावर नियमानुसार कठोर कारवाई – सभापती प्रा. राम शिंदे, अवधूत पवार यांच्या आंदोलनाची दखल; अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

जामखेड प्रतिनिधी

शासकीय नियमानुसार अतिक्रमणावर कारवाई करण्यात येईल, कोणाचीही गय केली जाणार नाही, नियमानुसार सर्व अतिक्रमणे हटविण्यात येतील तशा संबधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन सुचना देण्यात आल्या आहेत. असे स्पष्ट मत महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.

आज सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांच्या साखळी उपोषण स्थळी त्यांनी भेट देऊन अवधूत पवार यांची विचारपूस करून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना अतिक्रमण विषयावर तातडीने नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अतिक्रमणाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून शहराच्या विकासात अडथळा ठरत आहे. सार्वजनिक रस्ते व शासकीय जागा मोकळ्या करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील, असेही शिंदे यांनी नमूद केले.

या प्रसंगी प्रांताधिकारी नितीन पाटील, जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी शुभम जाधव, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या सह यावेळी बाजार समिती सभापती पै.शरद कार्ले, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.कैलास माने, मनसे नेते प्रदीप टापरे, भाजपा शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद, ग्रामीण मंडल अध्यक्ष बापुराव ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगेश आजबे, काँग्रेसचे राहुल उगले, शहाजीराजे भोसले, जामखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, प्रवीण चोरडिया, मनोज कुलकर्णी, प्राचार्य तथा नगरसेवक विकी घायतडक, पवन राळेभात, श्रीराम डोके, अमित चिंतामणी, प्रा.लक्ष्मण ढेपे, ॲड. प्रविण सानप, अशोक शेळके, उद्योजक गोरख घनवट, हवाशेठ सरनोबत, सनी सदाफुले, विनायक राऊत, रंगनाथ राळेभात, सरपंच, महारुद्र महारनवर, विजय पवार, प्रविण होळकर, अर्जुन म्हेत्रे, डाॅ.विठ्ठल राळेभात, डाॅ.अल्ताब शेख, ऋषिकेश मोरे, तुषार बोथरा यांच्या सह पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here