प्राथमिक शिक्षक संघ व गुरूमाऊली सदिच्छा मंडळाचा अनोखा उपक्रम, शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी घेतला कैतुकास्पद निणर्य
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुका प्राथमिक शिक्षक संघ गुरूमाऊली सदिच्छा मंडळ यांनी बैठक घेवून एक निर्णय घेतला की जामखेड तालुक्यातील ज्या शाळांचा सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करतील त्या शाळांना मदत म्हणून प्राथ. शिक्षक संघ गुरूमाऊली – सदिच्छा मंडळ यांच्याकडून २१०० रोख बक्षीस देण्यात येईल. त्याची सुरुवात धामणगाव शाळेचे मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष रूपेश वाणी यांना फेटा बांधून करण्यात आली.
धामणगाव शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी प्राथमिक शिक्षक संघ, गुरुमाऊली सदीच्छा मंडळाचे सर्व पदाधिकारी यामध्ये शिक्षक बैंकचे संचालक संतोष कुमार राऊत, विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते, राज्य प्रतिनिधि बाबासाहेब कुमटकर, शिक्षक नेते पांडुरंग मोहळकर, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष एकनाथ (दादा) चव्हाण, दक्षिण जिल्हा प्रमुख केशवराज कोल्हे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा संघटक प्रतापराव पवार, तालुकाध्यक्ष अविनाश नवसरे, आदर्श शिक्षक बाळासाहेब ज़रांडे व धामणगावचे भूमिपुत्र तंत्रस्नेही संघाचे जामखेड तालुका कार्यकारी अध्यक्ष तात्यासाहेब घूमरे आदी उपस्थित होते.
यावेळी संघ व मंडळाच्या वतिने धामणगाव शाळेच्या संपूर्ण स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी २१०० रूपये बक्षीस रोख स्वरूपात देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळा या गरिबांच्या शाळा आहेत. त्या शाळेना सांस्कृतीक कार्यक्रम घेताना अनंत अडचणी येतात. आर्थिक मदत फार महत्वाची असते. आम्ही घेतलेला निर्णय फार मोठी रक्कम नाही. पण एक नवी पायवाट नक्की आहे. गावागावातील तरूण मंडळ, पक्ष, संघटना पुढे येवून या पायवाटेचा मार्ग निवडला तर हमरस्ता होण्यास वेळ लागणार नाही. आमच्या या निर्णयाचे स्वागत आमच्या सर्वाचा सत्कार धामणगावचे सरपंच महारुद्ध महारणवर यांनी आम्हा सर्वांना शाल गुलाब पुष्प देवून केला. एक वेगळी संधी आणि वेगळा संदेश यातून निर्माण होईल, असे गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष एकनाथ (दादा) चव्हाण यांनी सांगितले.