अहमदनगर-साबलखेड-आष्टी या 670 कोटीच्या कामाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
अहमदनगरः सुरत ते चेन्नई आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन नवीन प्रस्तावित महामार्ग महाराष्ट्रासाठी लाईफ लाईन ठरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अहमदनगर येथे आयोजित राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच अहमदनगर- साबलखेड-आष्टी 670 कोटीचा रस्ता कामाचे त्यांनी घोषणा केली.
यावेळी व्यासपीठावर खासदार डॉक्टर सुजय विखे,आमदार मोनिकाताई राजळे,माजी मंत्री राम शिंदे भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह आमदार पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मंत्री नितीन गडकरी यांच्या हसते तीन मार्गांचे डिजिटल लोकार्पण करण्यात आले. यामध्ये अहमदनगर बायपास, अहमदनगर करमाळा चौपदरीकरण, अहमदनगर,मिरजगाव टेंभुर्णी या मार्गाचा समावेश आहे.
अहमदनगर बायपास आणि नगर करमाळा रस्त्याचे लोकार्पण यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, नगर जिल्ह्यात 12 हजार कोटी रुपयांचे कामे सुरु आहेत. एकूण 21 कामापैकी 11 कामे पूर्ण झाले आहेत. पुण्यापासून नगर पर्यंत येताना अडचण येते, पुणे शहरात खाली रस्ता वर उड्डाणं पूल, वरती उड्डाणं पूल आणि वरती मेट्रो यासाठी 50 हजार कोटी रुपयांचे उड्डाणं पूल मंजूर केले हा उड्डाणं पूल शिरूर पर्यंत येणार आहे. त्यानंतर शिरूर ते छत्रपती संभाजी नगर पर्यंत नवीन रस्ता बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे अंतर केवळ 2 तासात पूर्ण होईल. 
नवीन कामांची घोषणा त्यांनी यावेळी केली. माळशेज घाट, नाणेघाट नगर बायपास, नगर साबलखेड, नांदूर शिंगोटे कोल्हार, ह्या नवीन रस्त्यांची घोषणा त्यांनी केली. नगर जिल्ह्याचे भविष्य बदलविणारे रस्ता म्हणजे सुरत नाशिक अहमदनगर सोलापूर अक्कोलकोट आणि पुढे हैदराबाद असा आहे. सर्व दक्षिणेत जाण्यासाठी हा रस्ता असणार असून दिल्ली ते चेन्नई या मार्गांवरील 320 किमी अंतर कमी होणार आहे. हा ग्रीन फिल्ड अलायन्मेंट आहे. सर्वात मोठी लाईफ लाईन हा रस्ता होणार आहे. यासाठी 80 हजार कोटी आहे. याचा फायदा नाशिक नगर बीड धाराशिव सोलापूर या जिल्ह्यातून जाणार आहे. राज्यातून हा 482 किमी आहे. याचं बरोबर त्यांनी 41 हजार 476 कोटी किमतीच्या ऍक्सीस कंट्रोल हायवे ची माहिती दिली.
इथेनॉलपासून हवाई इंधन तयार करण्यास भारताने सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी अन्नदाता आणि ऊर्जादाताही झाला आहे. त्यामुळे आता साखर कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अहमदनगर जिल्ह्यातील अकरा हजार कोटींची रस्ते विकास कामे प्रगतीपथावर असून 2024 अखेर अमेरिकेच्या तोडीचे रस्ते नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांचे होतील, असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. अहमदनगर बाहेरून जाणारा रस्ता तसेच नगर-करमाळा रस्त्याच्या दोन टप्प्यांचे मिळून सुमारे 3 हजार कोटींच्या कामांचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना गडकरी यांनी देशभरात सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कार्यक्रमांची माहिती दिली. सुरत ते चेन्नई महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातून जात असून या रस्त्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील 141 किलोमीटर कामासाठी 11 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय पुणे-संभाजीनगर महामार्गावर पुण्यापासून शिरूर पर्यंत उड्डाणपूल असेल आणि तेथून 40 मिनिटात अहमदनगर गाठता येईल. जिल्ह्याचे हे दोन रस्ते महाराष्ट्राची लाईफ लाईन ठरणार आहेत, असे स्पष्ट करून गडकरी म्हणाले, इथेनॉलपासून हवाई इंधन तयार करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी अन्नदाता तर आहेच; परंतु आता ऊर्जादाताही झाला आहे.
पंजाबात तणस पासून डांबर तयार केले जात आहे. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यामुळे समृद्धी लाभलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांनी आता ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढे यायला हवे. भविष्यात हीच टेक्नॉलॉजी असणार आहे. बायोमास पासून मिथेन तयार केल्यावर त्यातून हायड्रोजन निर्मिती करता येते. हायड्रोजनवर कारखाने, रेल्वे इंजिन, ट्रक, बसेस, विमानेही चालू शकतात. त्यामुळे ऊर्जा आयात करणारा आपला देश आता ऊर्जा निर्यात करणारा होणार आहे, असा दावाही गडकरी यांनी केला.

अहमदनगर जिल्ह्यात 12 हजार कोटींची 21 रस्त्यांची कामे मंजूर केली होती. त्यापैकी 11 कामे पूर्ण झाली आहेत आणि नऊ कामे प्रगतीपथावर आहेत असे स्पष्ट करून गडकरी म्हणाले, सुरत ते चेन्नई अहमदनगर मार्गे रस्ता हा स्वतंत्र 11 हजार कोटींचा आहे. जिल्ह्याचे चित्र यामुळे बदलत आहे. जिल्ह्यात आता नवीन कामे माळशेज आणि आणे घाटाचा 400 कोटींचा रस्ता, अहमदनगर- सबलखेड- आष्टी 670 कोटीचा रस्ता, नांदूर शिंगोट ते कोल्हार हा 350 किलोमीटरचा रस्ता होत आहे. अहमदनगर ते शिर्डी या 75 किलोमीटरच्या कामास अनेक अडचणी आल्या. जुना ठेकेदार बदलून नवीन ठेकेदार दिला आहे. पहिल्या टप्प्यात 15 कोटी रुपये खर्चून रस्ता दुरुस्ती केली जात आहे व 677 कोटीची या रस्त्याची निविदा मंजूर आहे. आतापर्यंत दहा टक्के काम झाले आहे व लवकरच या रस्त्याचे कामही पूर्ण होईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

तसेच तसेच खासदार विखेंच्या माध्यमातून जिल्ह्यात मार्गी लागणाऱ्या विविध विकासकामांचे देखील त्यांनी यावेळी कौतुक केले. याबद्दल खासदार विखेंनी देखील त्यांचे आभार मानून भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि विकासकामांची माहिती नितीन गडकरी यांना या कार्यक्रमाच्या दरम्यान दिली.

यावेळी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे यांनी मंत्री गडकरी यांचे विशेष आभार मानले. माझ्या खासदारकीच्या पाच वर्षाच्या काळात नितीनजी गडकरी रस्ते विकास मंत्री नसते तर मी जिल्ह्याला काहीही देऊ शकलो नसतो, अशी कबुली त्यांनी दिली. तसेच गडकरी यांनी जिल्ह्यासाठी दिलेले योगदान पुढील चाळीस वर्षे जिल्ह्याची युवा पिढी विसरू शकणार नाही. या कामामुळे जिल्ह्याचे युवक भविष्याची उज्वल स्वप्ने पाहत आहेत आणि भविष्यातही नगर जिल्ह्याचा अविरत विकास चालू राहील, असा विश्वासही खासदार विखे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here