दिव्यांग व वयोश्री लाभार्थ्यांच्या प्रश्नांबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विखेंना निवेदन
जामखेड प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष नय्युमभाई सुभेदार यांनी धनश्री विखे पाटील यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग व वयोश्री यांना विना अट घरकूल तसेच ज्या दिव्यांग व वयोश्री लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही, अशांना लवकरच साहित्य मिळावे.
याप्रसंगी माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, बाजार समिती चे माजी संचालक करण ढवळे, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जवळा गटाचे अध्यक्ष राहुल भालेराव, मच्छिंद्र भोसले, संजय मोरे, सचिन उगले, सरफराज शेख, सोहेल तांबोळी, धर्मेश लोंढे, संभाजी पवार,माहिला आघाडीच्या श्रीमती शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.