जामखेड येथील डॉ. चौरे बालरुग्णालय येथे बालकांवर गेल्या बारा वर्षांपासून योग्य व यशस्वी उपचार.
नगरसारख्या सुविधा डॉ. चौरे बालरुग्णालयात उपलब्ध -डॉ प्रताप चौरे
जामखेड प्रतिनिधी
रुग्णांच्या वायफळ तपासण्या करून कुठलाही अतिरिक्त खर्च न करता, आपल्या अनुभवाने योग्य रोगनिदान करुन बालकांवर, जामखेड येथील डॉ चौरे बालरुग्णालयात गेल्या बारा वर्षांपासून योग्य उपचार करण्यात येत आहेत. सुसज्ज व उच्च प्रतीच्या उपचार सुविधा या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असल्याने रुग्णांना आता नगर किंवा पुण्याला जाण्याची आवश्यकता नाही.
जामखेड शहरातील नावाजलेले डॉ प्रताप चौरे हे एक नामांकित वरीष्ठ व अनुभवी बालरोगतज्ञ व नवजात शिशुतज्ञ आहेत. ते गेल्या १२ वर्षांपासून जामखेड परीसरातील बालकांवर यशस्वी उपचार करत आहेत. आपल्या अनुभवाने व योग्य पध्दतीने रुग्णांच्या वायफळ तपासण्या करून कुठलाही अतिरिक्त खर्च न करता, योग्य रोगनिदान करुन बालकांवर उपचार करण्यास सक्षम आपल्या बालकांसाठी अनुभवी व सुरक्षित असे हॉस्पिटल डॉ. चौरे बालरुग्णालय येथे अत्यंत सुसज्ज व उच्च प्रतीच्या उपचार सुविधा उपलब्ध आहे. या मध्ये
१) नवजात शिशू ते १२ वर्षांपर्यंतच्या बालकांचे सर्व लसीकरण, आजाराचे निदान, उपचार तसेच बालकांना उत्कृष्ट आहार व आरोग्या बद्दल योग्य मार्गदर्शन केले जाते.
२) नवजात शिशुसाठी काचेची पेटी मधील उपचार (NICU)-
फक्त १५००/- रु प्रतिदिवस असल्याने इतर हॉस्पिटल पेक्षा रुग्णांना फक्त ५०% च खर्च येतो.
:- या मध्ये जन्मतः बाळ न रडणे
:- बाळाला श्वास घेण्यास त्रास होणे
:- बाळाने आईच्या गर्भाशयात शी केली असल्यास
:- कमी वजनाचे व कमी दिवसाचे बाळ
:- जन्मताच बाळ काळे निळे दिसु लागल्यास
:- कावीळ
या पैकी कुठलेही लक्षणे आढळल्यास व (NICU) मध्ये कुठल्याही आजारांसाठी बाळ एडमिट केल्यास प्रती दिवस खर्च फक्त १५००/- रुपये
(अटी लागू)
3) हॉस्पिटल मध्ये नामांकित कंपनी च्या कॅशलेश सुविधा उपलब्ध आहेत. यामधे स्टार हेल्थ, SBI जनरल इन्शुरन्स, चोलामंडल जनरल इन्शुरन्स, NVGT Care, बजाज अलायन्स इत्यादी.
4) बालकां मधील आढळणाऱ्या खालील आजारामध्ये (न्युमोनिआ, गॅस्ट्रो, टायफॉईड, मलेरिया, गोचिडताप, काविळ, व्हायरल फीव्हर) ॲडमीट करण्याची गरज पडल्यास यावरील हॉस्पिटलचा प्रति दिवसाचा जनरल वॉर्ड चा खर्च फक्त 1000/- प्रति दिवस एवढ्या नाममात्र खर्चात करण्यात येत आहे.
आपला तालुका शेती प्रधान असुन,
सर्व सामान्य गरीब जनतेचा विचार करुन ईतर हॉस्पिटल पेक्षा कमी दरात, कसलीही तडजोड न करता योग्य पद्धतीने उपचार डॉ चौरे बालरुग्णालयात केले जातात, अशी माहिती डॉ चौरे बालरुग्णालयाचे संचालक बालरोगतज्ञ डॉ. प्रताप चौरे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here