राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या युवक तालुकाध्यक्षपदी प्रशांत राळेभात
जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्जत जामखेड कार्यकुशल आमदार रोहित पवार यांच्या आदेशाने नुकत्याच कर्जत येथे पार पडलेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे निष्ठावंत व युवक कार्यकर्ते प्रशांत जालिंदर राळेभात यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, रमेश आजबे, नूतन तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, कार्यध्यक्ष सागर कोल्हे, सोशल मिडीया प्रमुख काकासाहेब कोल्हे , शहराध्यक्ष वसीम सय्यद यांच्यासह कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस चे कट्टर समर्थक प्रशांत जालिंदर राळेभात यांच्या आई या जामखेड ग्रामपंचायतच्या पाच वर्षे सरपंच होत्या तर वडील हे ग्रामपंचायत सदस्य होते. प्रशांत राळेभात हे आ. रोहित पवार यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. प्राशात राळेभात यांनी टंचाईच्या काळात देखील आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी मोफत टँकरने पाणी वाटप केले आहे. तसेच प्रशांत राळेभात हे गेल्या आनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून देखील ओळखले जात आहेत, त्यांच्या कामावर विश्वास ठेऊन आ. रोहित पवार यांनी प्रशांत राळेभात यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. या निवडीबद्दल पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह समाजातील विविध यान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here