राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या सोशल मिडिया तालुकाध्यक्षपदी काकासाहेब कोल्हे यांची फेरनिवड
जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्जत जामखेड कार्यकुशल आमदार रोहित पवार यांच्या आदेशाने काल दि. ७ फेब्रुवारी रोजी कर्जत येथे पार पडलेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे निष्ठावंत व युवक कार्यकर्ते
काकासाहेब कोल्हे यांची सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, रमेश आजबे, नूतन तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, युवक अध्यक्ष प्रशांत राळेभात, कार्यध्यक्ष सागर कोल्हे, यांच्यासह कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

नवनियुक्त सोशल मीडिया तालुकाध्यक्ष काकासाहेब कोल्हे हे गेली अनेक वर्षांपासून करत असलेल्या प्रामाणिकपणे कामामुळे त्यांची या पदावर फेरनिवड करण्यात आली आली आहे. या निवडीबद्दल पक्षपदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह समाजातील विविध यान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here